MS Dhoni's Reaction on Retirement : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) सात विकेट्सनं पराभव केला. या विजयासह धोनीच्या (Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई संघाने प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर चेन्नईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. यासोबतच धोनीनं त्याच्या क्रिकेटमधील निवृत्तीबाबतबी मोठं वक्तव्य केलं आहे.


चेपॉकमध्ये 'कॅप्टन कुल'चा मोठा खुलासा


चेपॉक स्टेडिअमवरील हैदराबाद विरोधातीत सामन्यात विजयानंतर धोनीनं प्रतिक्रिया देताना काही विषयांवर प्रकाश टाकला. यावेळी धोनीने चेन्नई संघ आणि चेन्नईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी म्हणाला की, चेन्नईतील प्रेक्षकांकडून मला जे प्रेम मिळत आहे, त्यामुळे त्यामुळे भारावून गेलो आहे. येथे खेळणं म्हणजे नेहमीच एक वेगळा अनुभव असतो.  म्हणाला की, दोन वर्षांनंतर प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळाली असून त्यांच्यासमोर खेळणं खूप खास आहे. तसेच पुढे धोनी म्हणाला, 'काहीही झाले तरी हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे आणि त्याचा आनंद घेणं खूप महत्त्वाचं आहे.






IPL 2023 : धोनीची क्रिकेटमधून निवृत्ती?


धोनीला चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानावर म्हणजे चेपॉक मैदानावर नेहमीच चाहत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. जेव्हाही येथे येतो तेव्हा खूप छान वाटतं, अशी प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे. चेन्नई संघाच्या या फॅन फॉलोइंगबद्दल धोनी म्हणाला, 'येथे येऊन खूप छान वाटतं. चाहत्यांनी खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. ते नेहमी मला ऐकण्यासाठी शेवटपर्यंत थांबतात.




 


निवृत्तीबाबत नेमकं काय म्हणाला धोनी?


महेंद्र सिंह धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यापासून आयपीएल शिवाय कोणत्याही स्पर्धात्मक क्रिकेट सामन्यात भाग घेतलेला नाही. त्यामुळे आयपीएल 16 वा हंगाम धोनीचा शेवटचा हंगाम असेल, अशी शक्यता चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर धोनी म्हणाला की, 'मी अजून कितीही वेळ खेळलो तरी हा माझ्या करिअरच्या शेवटच्या टप्पा आहे. त्यामुळे याचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : 'हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा', हैदराबादवरील विजयानंतर धोनी भावुक; पाहा Video