MI vs CSK MS Dhoni : कॅप्टन कूल धोनीची निर्णयक्षमता सर्वांनाच माहित आहे, त्याबद्दल नवीन काही सांगायची गरज नाही. मैदानावर धोनी आपल्या निर्णायामुळे नेहमीच प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ढकलतो.. विकेटच्या मागून गोलंदाजांना सूचना करणे असो अथवा फिल्डिंगमध्ये बदल करणे... यामध्ये धोनी माहिर आहे. त्याशिवाय क्रिकेटमध्ये धोनी डीआरएससाठीही ओळखला जातो. धोनीने घेतलेले डीआरएस आतापर्यंत जवळपास सर्वच यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे डीआरएसला धोनी रिव्हू सिस्टम असेही क्रीडा चाहते म्हणतात. याचीच प्रचिती आज वानखेडेवर आली. मुंबईचा सूर्यकुमार यादव फलंदाजी करत असताना धोनीने झेलबादची पंचांकडे दाद मागितली... पंचांनी नाबाद असल्याचे सांगितले...त्याचक्षणी धोनीने तात्काळ डीआरएस घेतला.. तिसऱ्या पंचांना सूर्या बाद असल्याचे आढळले... त्यानंतर सोशल मीडियावर धोनी रिव्हू सिस्टम पुन्हा एकदा चर्चेत आले. सोशल मीडियावर नेटकरी धोनीचे कौतुक करत आहेत. 


धोनी सध्या फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. 2019 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण इतक्या वर्षांनंतरही, परिस्थिती बदललेली दिसत नाही कारण धोनीने सूर्यकुमार यादवविरुद्ध झेल घेण्यासाठी डीआरएस घेतला. ज्याला पंचांनी सुरुवातीला नाबाद दिले. मात्र धोनीने तात्काळ डीआरएस घेतला. त्यानंतर अल्ट्राएजमध्ये सूर्या बाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पंचांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. धोनीच्या अचूक DRS कॉलवर चाहत्यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. प्रत्येकजण माहीचे कौतुक करत आहे. 


 


















































रविंद्र जाडेजा आणि मिचेल सँटनर यांच्या फिरकीपुढे मुंबईच्या संघाची दाणादाण उडाली. वानखेडे मैदानावर प्रथम फंलदाजी करताना मुंबईने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 157 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. चेन्नईकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. चेन्नईला विजयासाठी 158 धावांचे आव्हान देण्यात आलेय.