MS Dhoni IPL Income : जगातील महान विकेटकीपर फलंदाज आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आणखी एक विक्रम  आपल्या नावावर केला आहे. महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू बनला आहे. धोनीने आतापर्यंत 150 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जबरोबर करार वाढल्यामुळे धोनीला पगाराच्या रूपात 15 कोटींचं मानधन मिळालं आणि त्याची कमाई 150 कोटींपेक्षा अधिक झाली. करारात वाढ होण्याआधी धोनीची एकूण कमाई 137 कोटींपेक्षा जास्त होती.


आयपीएल 2008 मधील सर्वात महागडा खेळाडू


विशेष म्हणजे, महेंद्रसिंग धोनी हा आयपीएल 2008 च्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू होता. त्यावर्षी त्याला चेन्नई सुपर किंग्जने 6 कोटींमध्ये विकत घेत त्याला कर्णधार देखील केलं होतं. यानंतर, पुढील तीन वर्षे त्याचा पगार  तसाच राहिला. 2011 मध्ये बीसीसीआयने रिटेंशनची किंमत वाढवून 8 कोटी केली. यानंतर 2011 ते 2013 या काळात धोनीचा पगार 8.28 कोटी एवढा होता.


आयपीएल 2014 मध्ये बीसीसीआयने पुन्हा एकदा खेळाडूंच्या रिटेंशनची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे धोनीने 2014 आणि 2015 या काळात धोनीला दरवर्षी 12.5 कोटी एवढां पगार होता. 2016 आणि 2017 या काळात चेन्नई सुपर किंग्जवरील बंदीमुळे धोनी 2016 आणि 2017 या दोन्ही आयपीएल मौसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला होता. या दरम्यान त्याचा पगार 25 कोटी झाला.


2018 पासून 15 कोटी/ करोड़ पगार


तीन वेळा आयपीएलचा विजेता चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 2018 मध्ये सीएसकेचा लीगमध्ये परत आल्यानंतर 60 कोटींची कमाई केली आहे.


रोहित आणि विराटला मागे टाकलं


आयपीएलमधील कमाईच्या बाबतीत धोनीने भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मालाही मागे टाकले आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित कमाईच्या बाबतीत दुसर्‍या स्थानावर आहे आणि त्याची एकूण कमाई 146.6 कोटी रुपये आहे. तर आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली 143.2 कोटी रुपयांच्या कमाईसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.