IPL 2021 Auction : इंडियन प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारीला होणार आहे. हा लिलाव चेन्नईमध्ये होणार असल्याची माहिती आयपीएलच्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवरुन देण्यात आली आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी खेळाडूंची बोली लावण्यात येणार आहे. आयपीएलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “18 फेब्रुवारीला आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव चेन्नईत होणार आहे. यावर्षी आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावाबद्दल आपण किती रोमांचित आहात?


हा लिलाव 18 तारखेला ठेवण्यात आला आहे कारण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा दुसरा कसोटी सामना चेन्नईमध्ये 17 फेब्रुवारीला संपणार आहे. चेन्नईमध्ये भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने खेळणार आहे. दुसरी कसोटी 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान होणार असून त्याच्या दुसर्‍याच दिवशी आयपीएलच्या लिलावासाठी टेबल सजणार आहे.


Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल


आतापर्यंत आयपीएलची तारीख व ठिकाण याबाबत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, असे बोलले जात आहे की एप्रिलच्या मध्यापासून त्याची सुरुवात होऊ शकते. आयपीएल 2021 च्या बैठकीतही अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.


मोठ्या खेळाडूंना रिलीज करण्यात आलंय
खेळाडूंना कायम ठेवण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी होती. ट्रेडिंग विंडो (एका संघाकडून दुसर्‍या संघात खेळाडूंचे हस्तांतरण) 4 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहिल. वेगवेगळ्या संघातून मुक्त झालेल्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स) आणि ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब) सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.


यावेळी आयपीएल 2021 चा लिलाव खूप रंजक ठरू शकतो. कारण लिलावापूर्वी जवळपास सर्वच संघांनी मोठ्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. अशा परिस्थितीत आता कोणता संघ कोणत्या खेळाडूवर बोली लावतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.