Ms Dhoni - the Greatest Ever Finisher : वानखेडे मैदान आज धोनी धोनी नावाच्या जयघोषानं खवळून निघालं होतं. धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते चातकाप्रमाणे वाट पाहत होते. धोनीनेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. चार चेंडू शिल्लक असताना धोनी मैदानात आला. धोनी मैदानात येताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. शोर मीटरही बंद पडल्यासारखं झालं होतं. धोनी आला चार चेंडू खेळला अन् धू धू धुतलं. धोनीनं हार्दिक पांड्याची गोलंदाजी फोडून काढली. धोनीसारखा फिनिशर झालाच नाही, आशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. आयपीएलमध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.  


19 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्यानं डॅरेल मिचेल याला तंबूत धाडलं. त्यानंतर स्टेडियमवर एकच जल्लोष सुरु झाला. कारण, धोनी मैदानात परत आला होता. धोनी आला अन् जिंकून गेला. धोनीने हार्दिक पांड्याच्या पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार लगावले. हार्दिक पांड्याला चेंडूही टाकता येईना, अशी अवस्था झाली होती. चेन्नईचा संघ 200 धावांपर्यंत पोचणार की नाही? असा सवाल चेन्नईच्या चाहत्यांमध्ये होता, पण धोनी असेल तर काहीच अशक्य नाही. धोनीने आल्या आल्या षटकाराने सुरुवात केली. त्यानंतर धोनीने षटकाराची हॅट्ट्रीकच केली. हार्दिक पांड्याचा चेहरा पाहण्यासारखा होता. धोनीने फक्त चार चेंडूवर 20 धावा वसूल करत चेन्नईची धावसंख्या 200 पार पोहचवली. 


धोनीच्या फलंदाजीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. धोनीने हार्दिक पांड्याला मारलेले तीन षटकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


पाहा व्हिडीओ --- 







धोनीनं हार्दिक पांड्याची गोलंदाजी फोडल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय. धोनीसाठी नेटकरी वेगवेगळ्या उपमा देत आहे. धोनीसारखा फिनिशर नाही. 42 व्या वर्षीही धोनी एखाद्या तरुणाला लाजवेल अशी फटकेबाजी करत असल्याचं दिसतेय. सोशल मीडियावर नेटकरी काय म्हणतायत पाहा... 


 

































चेन्नईची 206 धावांपर्यंत मजल - 


ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 69 तर शिवम दुबे यानं 66 धावांची खेळी केली. एमएस धोनीने अखेरच्या चार चेंडूवर 20 धावांचा पाऊस पाडला. मुंबईकडून हार्दिक पांड्यानं दोन विकेट घेतल्या. मुंबईला विजयासाठी 207 धावांची गरज आहे.