MI vs CSK, IPL 2024 : एल क्लासिको सामन्यात हार्दिक पांड्यानं नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. मुंबई इंडियन्स प्रथम गोलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्याने चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर यंदाच्या आयपीएलमधील सर्वात रोमांचक सामना होणार आहे.  आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबईची सुरुवात  अतिशय खराब झाली. परंतु, मागच्या दोन सामन्यांमध्ये दणदणीत कामगिरी करत टीम विजयाच्या मार्गावर परतली आहे. मुंबई इंडियन्सने या स्पर्धेमधील दोन सामने जिंकले आणि तीन गमावले आहेत. सीएसकेने या स्पर्धेत तीन सामने जिंकले आणि दोन सामने हरले आहेत. त्यामुळे सीएसकेलाही विजयाची आशा आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्याकडे आयपीएलप्रेमीचं लक्ष लागलेले आहेत. हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी आहेत. चेन्नईने पाच आणि मुंबईने पाच आयपीएल चषकावर विजय मिळवला आहे.


हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईविरोधात मुंबईच्या ताफ्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील विजयी संघच कायम उतरवण्यात आला आहे. दुसरीकडे चेन्नईच्या ताफ्यात एक बदल करण्यात आला आहे. मथिशा पथिराणा याचं चेन्नईच्या प्लेईंग 11 मध्ये कमबॅक झालं आहे. महिश तिक्ष्णा याला आराम देण्यात आला आहे.  पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11


मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 -  रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, टीम डेविड, मोहम्मद नबी, रोमिरिओ शेफर्ड, श्रेयस गोपाळ, जसप्रीत बुमारह, गेराल्ड कोइत्जे


राखीव खेळाडू -  सूर्यकुमार यादव, डेवॉल्ड ब्रेविस, नमन धीर, वढेरा, हार्विक


Mumbai Indians: 1 Rohit, 2 Ishan, 3 Surya, 4 Hardik, 5 Tilak, 6 David, 7 Nabi, 8 Romario, 9 Shreyas, 10 Bumrah, 11 Coetzee


Subs: Surya, Brewis, Dhir, Wadhera, Harvik


चेन्नईची प्लेईंग 11 - ऋतुराज गायकवाड, रचिन गायकवाड, डॅरेल मिचेल, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, एमएस धोनी, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान


राखीव खेळाडू - पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली


Chennai Super Kings: 1 Gaikwad, 2 Rachin, 3 Mitchell, 4 Dube, 5 Rahane, 6 Rizvi, 7 Dhoni, 8 Jadeja, 9 Shardul, 10 Deshpande, 11 Mustafizur


Subs: Pathirana, Sindhi, Santner, Moeen, Rasheed