MS Dhoni Muscle Tear IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये एमएस धोनीनं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडलाय. तो अखेरच्या दोन षटकासाठी फलंदाजीला मैदानात उतरतो. समालोचकांनी धोनीनं वरती फलंदाजी करावी, असा सल्ला दिला. पण धोनी तळाला का फलंदाजीला येतो. यामागील कारण समोर आलेय. धोनी दुखापतग्रस्त आहे, त्याला डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलाय. तरीही तो खेळत आहे. रिपोर्ट्सनुसार, एमएस धोनीचे स्नायू दुखावले आहेत. धोनीला आरामाचा सल्ला देण्यात आलाय. धोनीची दुखापत गंभीर असल्याचं बोललं जातेय. 


धोनी दुखापतीने त्रस्त - 


'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका रिपोर्ट्सनुसार, धोनीच्या पायाचे स्नायू फाटलेले आहेत. आयपीएलच्या सुरुवातीलाच धोनीच्या स्नायू फाटले होते. पण संघातील दुसरा विकेटकीपर फलंदाज डेवॉन कॉनवेही दुखापतग्रस्त झालाय. त्यामुळे धोनीला ब्रेक घेण्याची संधीच मिळाली नाही. पण धोनीची दुखापत जास्त तिव्र झाली आहे, त्याला आरामाची गरज आहे. धोनी सध्या गोळ्या-औषधाच्या मदतीने मैदानात उतरत आहे. दुखापतीमुळे धोनी मैदानावर कमी पळण्याचा प्रयत्न करत आहे. पण पर्यायी विकेटकीपर फीट नसल्यामुळे धोनीला मैदानात उतरावेच लागत आहे. 






मिळालेल्या माहितीनुसार, दुखापत गंभीर असतानाही धोनी मैदानावर उतरला, त्यामुळे त्यामध्ये वाढ झाली. डॉक्टरांनी धोनीला आरामाचा सल्ला दिला होता. पण चेन्नईला गरज असल्यामुळे धोनी मैदानावर उतरला. दरम्यान, आयपीएल 2023 मध्ये धोनी दुखापतग्रस्त होता, तरीही तो खेळला होता. आयपीएलनंतर धोनीनं तात्काळ सर्जरी केली होती. आताही धोनी दुखापतीने त्रस्त आहे, तरीही तो खेळत आहे.






यंदाच्या हंगामातील धोनीची कामगिरी - 


एमएस धोनीनं आयपीएल 2024 मध्ये 11 सामने खेळले आहेत. त्यानं 225 च्या स्ट्राईक रेटनं वादळी फलंदाजी करत 110 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश आहे.
 
सर्वाधिक झेल घेणारा विकेटकीपर - 


आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा विकेटकीपर म्हणून धोनीच्या नावावर विक्रम झाला आहे. रविवारी धोनीने आयपीएलमध्ये 150 झेलचा विक्रम केला. दुसऱ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक तर तिसऱ्या क्रमांकावर वृद्धीमान साहा याचा क्रमांक लागतो.