CSK vs RCB : चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा कर्णधार यंदा बदलला असून एमएस धोनीनंतर (MS Dhoni) ही जबाबदारी रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान आयपीएल 2022 (IPL 2022) सुरु झाल्यापासून चेन्नई संघाला एकही विजय अद्याप मिळवता आला नव्हता. त्यांनी चार पैकी चार सामने गमावले. पण त्यानंतर मंगळवारच्या सामन्यात त्यांनी बंगळुरुला मात देत स्पर्धेतील पहिला-वहिला विजय मिळवला. या विजयामुळे नवनिर्वाचित कर्णधार जाडेजा आनंदी झाल्याचं दिसून आलं यावेळी त्याने हा विजय पत्नीला समर्पित करत असल्याचं सांगत तो आजही काही वरिष्ठ खेळाडूंकडून टीप्स घेत असल्याचंही त्याने सांगितलं.
सामन्यात जाडेजाने चार ओव्हरमध्ये 39 धावा देत तीन विकेट्स घेतले. त्यानंतर बोलताना जाडेजा म्हणाला,''आमच्याकडे चांगला अनुभव आहे, त्यातूनच आपण शिकत असतो. आम्ही लवकर घाबरत नाही स्वत:ला शांत ठेवून आमचा संघ खेळ करतो. तसंच मी माझा कर्णधार म्हणून पहिला विजय पत्नीला समर्पित करु इच्छितो.'' पुढे बोलताना जाडेजा म्हणाला,"आज मी एक कर्णधार असूनही मी अजूनही वरिष्ठ खेळाडूंकडून शिकत आहे. मी सामन्यादरम्यान कायमच धोनीकडून विविध निर्णयांवर चर्चा करत असतो. मी अजूनही शिकत आहे आणि अधिक चांगला होण्याचा प्रयत्न करत आहे.''
हंगामातील पहिलाच विजय
आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सलग चार सामने गमावल्यानंतर चेन्नईनं पहिला विजय नोंदवला आहे. या सामन्यात बगंळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं (Faf du Plessis) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात दोन विकेट्स गमावून 217 धावा केल्या. प्रत्युरात मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावून 193 धावापर्यंत मजल मारता आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IPL 2022, MI vs PBKS : आज मुंबईकर पुन्हा मैदानात समोर पंजाबचं आव्हान; कधी, कुठे पाहाल सामना?
- Yuzvendra Chahal : धक्कादायक! दारुच्या नशेत 'या' क्रिकेटरनं चहलसोबत केलं घृणास्पद कृत्य, कोण आहे ती व्यक्ती?
- RCB Fan Girl Poster: "आरसीबी जिंकेल तेव्हाच लग्न करेन", भरभैदानात महिला चाहतीनं झळकावलं पोस्टर, सोशल मीडियावर चर्चा सुरू