Sumit Nagal, Australian Open 2024 : सुमित नागल याने ऑस्ट्रेलिया ओपन 2024 मध्ये इतिहास रचला आहे. सुमित (Sumit Nagal) याने ऑस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्याच टप्प्यात ऐतिहासिक कामगिरी केली. सिंगल्स ग्रँड स्लॅममध्ये सुमित नागल याने अलेक्जेंडर बुब्लिक (Alexander Bublik) याचा पराभव केला. सुमित याने पहिल्या सेटपासूनच वर्चस्व मिळावलं. सुमितने अलेक्जेंडर बुब्लिक याचा 3-0 ने पराभव केला. सुमितने अलेक्जेंडर याचा सरळ तीन सेटमध्ये 6-4, 6-2, 7-6(5) असा पराभव केला. भारताच्या टेनिस इतिहासात सिंगल्स ग्रँड स्लॅममध्ये 35 वर्षात पहिल्यांदाच आपल्यापेक्षा जास्त रँकिंग असणाऱ्या खेळाडूचा भारतीय खेळाडूने पराभव केलाय. सुमित नागल याची एटीपी रँक 137 इतकी आहे. तर अलेक्जेंडर बुब्लिक (Alexander Bublik) याची एटीपी रँक 31 इतकी आहे.
ऑस्ट्रेलिया ओपन सिंगल्स ग्रँड स्लॅममध्ये सुमित (Sumit Nagal) याने अलेक्जेंडर बुब्लिक (Alexander Bublik) याला पराभवाचा धक्का दिला. सुमितने संपूर्ण सामन्यात एकतर्फी वर्चस्व मिळवलं. त्याने अलेक्जेंडर बुब्लिक (Alexander Bublik) याला कुठेही संधी दिली नाही. भारतीय टेनिससाठी हा विजय ऐतिहासिक ठरला.
1989 नंतर पहिल्यांदाच विजय -
सुमित नागल याच्याआधी रमेश कृष्णन याने सिंगल्स ड्रॉमध्ये सीडेड खेलाडूचा पराभव केला होता. 1989 नंतर आता सुमित याने सीडेड खेळाडूचा पराभव केला आहे. या विजयामुळे सुमित ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये दुसऱ्या फेरीत पोहचला आहे. त्याआधी नागल याला 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. 2021 मध्ये सुमित याला लिथुआनिया याचाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. लिथुआनिया याने 2-6, 5-7, 3-6 असा सुमितचा दारुण पराभव केला होता.
सुमितवर कौतुकाचा वर्षाव -
ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या सुमित नागल याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर सुमितच्या विजयाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सुमित नागल याच्या विजयाचा व्हिडीओ ऑस्ट्रेलिया ओपनच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओत विजयानंतर सुमितचा आनंद स्पष्ट दिसत आहे. विजयानंतर सुमित याने अलेक्जेंडर बुब्लिक याच्यासोबत हात मिळवल्याचेही दिसत आहे. उपस्थित असणाऱ्या चाहत्यांकडूनही सुमितच्या विजयाचा जल्लोष केल्याचं दिसतेय.