MI vs KKR IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने घरच्या मैदानावर नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. वानखेडे मैदानावर हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. सुनिल नारायण आणि फिलिप सॉल्ट यांचं आक्रमण रोखण्याचं आव्हान मुंबईपुढे असेल. 


हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. मुंबईच्या ताफ्यात एक बदल करण्यात आला आहे. मुंबईने मोहम्मद नबी याला बाहेर बसवलेय. त्याच्याजागी नमन धीर याला संघात घेतलं आहे. त्याशिवाय रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. 






मुंबईची प्लेईंग 11 


इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड,  जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह , नमन धीर, नुवान तुषारा


राखीव खेळाडू - रोहित शर्मा, शॅम्स मुलानी, शिवालिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, रोमरिओ शेफर्ड


कोलकात्याची प्लेईंग 11 - 
फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, अंगकृष्ण रघुवंशी,  वरुण चक्रवर्ती.





राखीव खेळाडू - 


चेतन सकारिया, अनुकुल रॉय, शेफर्न रुदरफोर्ड, केशस भरत, मनिष पांडे


वानखेडेची खेळप्टी कशी असेल?


वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे बरेच चौकार आणि षटकारही मारले जातात. खेळपट्टीवर चांगल्या उसळीमुळे चेंडू सहज बॅटवर येतो. अशा परिस्थितीत येथे 200 धावांचाही सहज पाठलाग करता येईल. या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईने 234 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत वानखेडे स्टेडियमवर हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळेल, असे मानले जात आहे. पहिल्या डावात गोलंदाजांना नव्या चेंडूची थोडीफार मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.