Mumbai Playoff Scenario : आयपीएल 2024 स्पर्धा आता रंगात आली आहे. प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफची गणितं लावली जात आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोलकात्याच्या सामन्याआधीही प्लेऑफची चर्चा सुरु आहे.  कोलकात्याविरोधात पराभव झाला तर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहचणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. याचं उत्तर जाणून घेऊयात...


मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी नवव्या क्रमांकावर आहे.  मुंबईचे दहा सामन्यात फक्त सहा गुण आहेत. त्यामुळे मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आता उर्वरित सामने मोठ्या फराकाने जिंकावेच लागतील. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवर मुंबईला अवलंबून रहावे लागणार आहे. दिग्गजांचा भरणा असणाऱ्या मुंबईला यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी करता आली नाही. कोलकात्याविरोधात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला, तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.


आयपीएल 2024 मध्ये मुंबईला अद्याप शानदार कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्सने दहा सामन्यात फक्त तीन विजय मिळवले आहेत. मुंबई इंडियन्सला सात पराभवाचा सामना करावा लागला. तीन विजयामुळे मुंबईच्या नावावर फक्त सहा गुण आहेत. मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. मुंबईसाठी आजचा सामना करो या मरो असाच आहे. आज मुंबईने सामना गमावला. तर त्यांचं आव्हान संपुष्टात येणार आहे. 


प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी काय?


मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात कोलकात्याचा पराभव करावाच लागेल. मुंबईला उर्वरित चारही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यानंतर इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे. मुंबईने उर्वरित चार सामने जिंकले तर आठ गुण मिळतील. त्यामुळे मुंबईकडे 14 गुण होतील. जर रनरेट चांगला असेल तर मुंबई 14 गुणांवर प्लेऑफमध्ये पोहचणार आहे. त्याशिवाय त्यांना इतरांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.  त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघाने सर्वच्या सर्व सामने जिंकले तरच त्यांना आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल. पण कोलकात्यानं मुंबईचा पराभव केला तर आजच गाशा गुंडाळावा लागणार आहे. 


PL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने - 


मुंबई इंडियन्सचे चार सामने शिल्लक आहेत. त्यापैकी दोन सामने कोलकाता संघाविरोधात आहेत. तर एक सामना लखनौ आणि एक सामना हैदराबादविरोधात आहे. मुंबईसाठी जमेची बाजू म्हणजे, चारमधील तीन सामने घरच्या वानखेडे मैदानावर आहेत. त्यामुळे मुंबईला विजयाची आशा असेल. पण चार सामने जिंकल्यानंतरही मुंबईला इतर संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. 


 3 मे 2024- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स


6 मे 2024 - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद


11 मे 2024 - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स


17 मे 2024 - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स