MI vs KKR IPL 2022 Marathi News : मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअमवर मुंबई आणि कोलकाता यांच्यात यंदाच्या आयपीएलचा 56 वा सामना सुरु आहे. या सामन्याआधी मुंबईला मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या फलंदाजीचा कणा असणारा सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार आहे. सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत रमणदीप सिंहला संधी देण्यात आली आहे. 


कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल गमावला. कोलकात्याच्या संघात तब्बल पाच बदल करण्यात आले आहे. अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले आहे. 


कोलकात्याची प्लेईंग 11 - 
वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती


मुंबईची प्लेईंग 11 - 
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), रमणदीप सिंह, तिलक वर्मा, कायरण पोलार्ड, टीम डेविड, डॅनिअल सॅम्स, एम. अश्विन, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, रायली मेरिडेथ 


मुंबई- कोलकाता हेड टू हेड रेकार्ड
आयपीएल 2022 चा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नवी मुंबईतील डीवायपाटील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्स राखून पराभव केला. आयपीएलमध्ये  कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स एकूण 30 सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सनं 22 सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सला केवळ 8 सामन्यांमध्ये पराभव करता आला आहे.


हे देखील वाचा-