MI vs PBKS, IPL 2023 : मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने वानखेडेवर नाणेफेक जिंकून प्रथम गलंदाजी करण्याचा निर्यय घेतला आहे. शिखर धवन आजही दुखापतीमुळे प्लेईंग ११ च्या बाहेर आहे. सॅम करन नाणेफेकीसाठी आला होता. नाणेफेक गमावल्यानंतर पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. मुंबईच्या संघात जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झालेय. दुखापतीतून सावरल्यानंतर जोफ्रा आर्चर टीम मध्ये परतला आहे.


रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे तर, पंजाब सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात हैदराबाद संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. तसेच पंजाब किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभवानंतर आज मुंबई विरुद्ध मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या संघात जोफ्रा आर्चर परतलाय.. पंजाबच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.. पाहा दोन्ही संघाची प्लेईंग ११


मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन :
 रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, तिलक वर्मा, अर्जुन तेंदुलकर, ऋतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ


पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन :
अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंह, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत सिंह भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत बरार, राहुल चाहर, अर्शदीप सिंह


Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध पंजाब सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 चा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही असाच प्रकार घडला आहे. येथील सपाट विकेटवर गोलंदाजांना विशेष मदत मिळत नाही. येथील सीमा लहान आहेत आणि आऊटफिल्ड खूप वेगवान आहे.


MI vs PBKS Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि पंजाब (PBKS) या संघांमध्ये आतापर्यंत 29 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड किंचित जड दिसून आलं आहे. मुंबई इंडियन्स संघाने 29 पैकी 15 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने 14 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.