IPL 2023 मध्ये अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि वृद्धीमान साहा दमदार फलंदाज करत आहेत. पण १६ महिन्यापूर्वी या तिन्ही खेळाडूंना टीम इंडियातून डच्चू मिळाला होता. जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात भारतीय टीमने तीन कसोटी सामन्याची मालिका खेळली होती. यामध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियातून अनेकांना डच्चू मिळाला होता. यामध्ये अजिंक्य रहाणे, साहा आणि इशांत शर्मा या दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश होता. दीड वर्षांपासून रहाणे, साहा आणि ईशांत शर्मा टीम इंडियाच्या बाहेर आहेत. पण आयपीएलच्या सोळाव्या हंगामात हे तिन्ही खेळाडूंनी आपल्या कामगिरीने प्रभावीत केलेय.
टीम इंडियातून बाहेरचा रस्ता मिळाल्यानंतर बीसीसीआयने अजिंक्य रहाणेला रणजी सामन्यात खेळून आपला फॉर्म परत आणण्यास सांगितले होते. तर वृद्धीमान साहा आणि ईशांत शर्मा यांना यापुढे संघात स्थान मिळणार नाही, असा इशाराच दिला होता. म्हणजेच ईशांत शर्मा आणि वृद्धीमान साहा यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपले आहे. पण या तिन्ही खेळाडूंनी आपले क्रिकेट अद्याप बाकी असल्याचे दाखवलेय. अजिंक्य रहाणे याने चेन्नईकडून धावांचा पाऊस पाडलाय. तर दिल्लीकडून इशांत शर्मा भेदक मारा करतोय. गुजरातकडून साहा सलामी फलंदाजाची जबाबदारी पार पाडतोय... त्याशिवाय विकेटकीपर म्हणूनही तो प्रभावी कामगिरी करत आहे.
टीम इंडियातून डच्चू मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांनी रणजी सामने खेळण्याचा निर्णय घेतला. पण साहा याने देशांतर्गत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियातून डच्चू मिळालेले अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि वृद्धीमान साहा आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित करत आहेत. या तिन्ही खेळाडूंनी अद्याप आपले खूप क्रिकेट बाकी असल्याचे दाखवलेय. अजिंक्य रहाणेने तर पावरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. रहाणेने अवघ्या वीस चेंडूत अर्धशतक झळकावत एकप्रकारे बीसीसीआयला इशाराच दिलाय.
वृद्धिमान साहा याने मागील IPL हंगमात 31.70 सरासरीने 317 जोडल्या हत्या. यंदाही साहाच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. शुभमन गिल आणि साहा यांची जोडी प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करत आहे. साहा १४५ च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडत आहे. त्याशिवाय विकिटकीपिंगही दर्जेदार करत आहे.
अजिंक्य रहाणे याला कसोटी संघातून डच्ची मिळाल्यानंतर IPL 2022 काही खास गेले नाही. पण यंदाच्या हंगामात रहाणेने धावांचा पाऊस पाडला आहे. चेन्नईकडून खेळताना रहाणेचा पावरप्लेमधील स्ट्राईक रेट २२२ इतका आहे. यंदाच्या आयपीएलमधील तीन डावात रहाणेनेने ४३ च्या सरासरीने १२९ धावा केल्या आहेत.
दिग्गज वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा दीड वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. शर्माने जवळपास १०० कसोटी सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलेय. २०२२ वर्ष शर्मासाठी काही खास गेले नाही. आयपीएलमध्ये कुणी खरेदीदारही मिळाला नाही. यंदा दिल्लीच्या संघाने ईशांतला आपल्या ताफ्यात घेतले. दिल्लीने पाच सामने गमावल्यानंतर ईशांत शर्माला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिले. यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात ईशांत शर्माने भेदक मारा केला. ईशांत शर्माने 4 षटकात अवघ्या १९ धावा खऱ्च करत दोन विकेट घेतल्या.. ईशांतला या कामगिरीमुळे सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.