MI vs KKR Live Updates : कोलकात्याचा मुंबईवर 53 धावांनी विजय

MI vs KKR, IPL 2022:  मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज लढत होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 May 2022 11:05 PM
कोलकात्याचा मुंबईवर 53 धावांनी विजय

165 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईचा जाव 113 धावांत संपुष्टात आला. मुंबईकडून ईशान किशनने 51 धावांची खेळी केली. 

MI vs KKR Live Updates : मुंबईला नववा धक्का, पोलार्डही बाद

डॅनिअल सॅम्स, एम अश्विन आणि कुमार कार्तिकेय एकापाठोपाठ एक बाद झाले. पोलार्ड 15 धावा काढून धावबाद झाला.

MI vs KKR Live Updates : मुंबईला पाचवा धक्का, ईशान किशन बाद

ईशान किशनच्या रुपाने मुंबईला पाचवा धक्का बसला आहे. अर्धशतकानंतर ईशान किशन बाद झाला आहे. तिलक वर्मा 6, रमणदीप सिंह 12, टीम डेविड 13 धावा काढून बाद झाले आहेत. मुंबई पाच बाद 100 धावा... मुंबईला विजयासाठी 35 चेंडूत 66 धावांची गरज

MI vs KKR Live Updates : रोहित शर्मा बाद, मुंबईला पहिला धक्का

 MI vs KKR Live Updates :  रोहित शर्माच्या रुपाने मुंबईला पहिला धक्का बसला. रोहित शर्मा दोन धावा काढून माघारी परतलाय. 

MI vs KKR Live Updates : मुंबईला विजयासाठी 166 धावांचे आव्हान

जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे कोलकाता संघाने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावांपर्यंत मजल मारली. 

MI vs KKR Live Updates : बुमराहचा भेदक मारा, कोलकात्याची फलंदाजी ढासळली

MI vs KKR Live Updates : बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याची फलंदाजी ढासळली आहे. बुमराहने पाच विकेट घेतल्या

MI vs KKR Live Updates : कोलकात्याची फलंदाजी ढासळली, सात गडी बाद

MI vs KKR Live Updates :  मुंबईच्या गोलंदाजीपुढे कोलकात्याची फलंदाजी ढासळली. पॅट कमिन्स शून्य धावसंख्येवर बाद

MI vs KKR Live Updates: कोलकात्याच्या संघाला चौथा धक्का, नतीश राणा आऊट

मुंबईविरुद्ध राजस्थानच्या संघाची चांगली सुरुवात झाली. परंतु, त्यानंतर मुंबईच्या संघानं जोरदार कमबॅक करत कोलकात्याच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं.

MI vs KKR Live Updates: अजिंक्य रहाणे पुन्हा ठरला फ्लॉप, कोलकात्याला दुसरा झटका

मुंबईविरुद्ध सामन्यात अजिंक्य रहाणे पुन्हा फ्लॉप ठरला आहे.  या सामन्यात त्यानं 24 चेंडूत 25 धावा केल्या आहेत. 

MI vs KKR Live Updates : कोलकात्याच्या संघाल पहिला धक्का, व्यंकटेश अय्यर बाद

कोलकात्याच्या संघाला तुफानी सुरुवात करून देणारा व्यंकटेश अय्यर बाद झाला आहे. त्यानं 24 चेंडूत 43 धावा केल्या.

MI vs KKR Live Updates : कोलकात्याच्या संघात 5 बदल

MI vs KKR Live Updates : कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल गमावला. कोलकात्याच्या संघात तब्बल पाच बदल करण्यात आले आहे. अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले आहे. 

MI vs KKR Live Updates : मुंबईची प्लेईंग 11

MI vs KKR Live Updates : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), रमणदीप सिंह, तिलक वर्मा, कायरण पोलार्ड, टीम डेविड, डॅनिअल सॅम्स, एम. अश्विन, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, रायली मेरिडेथ 




 


MI vs KKR Live Updates : कोलकात्याची प्लेईंग 11

MI vs KKR Live Updates : वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती

MI vs KKR Live Updates : मुंबईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय

MI vs KKR Live Updates :  मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार आहे. त्याजागी रमणदीप सिंह याला संधी देण्यात आली आहे. 


 

MI vs KKR Live Updates: कोलकात्याचा संभाव्य इलेव्हन 

आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, शेल्डन जॅक्सन/बाबा इंद्रजित (विकेटकीपर), आंद्रे रसल, अमन खान/अनुकुल रॉय, सुनील नरायण, टीम साऊथी, उमेश यादव/हर्षित राणा, शिवमहर्षी.

MI vs KKR Live Updates: मुंबईचा संभाव्य इलेव्हन

इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय/बेसिल थम्पी, जसप्रीत बुमराह, आर. मेरेडिथ.

MI vs KKR Live Updates: मुंबई- कोलकाता हेड टू हेड रेकार्ड

आयपीएल 2022 चा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नवी मुंबईतील डीवायपाटील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्स राखून पराभव केला. आयपीएलमध्ये  कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स एकूण 30 सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सनं 22 सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सला केवळ 8 सामन्यांमध्ये पराभव करता आला आहे.

MI vs KKR Live Updates: मुंबई-कोलकाता आमने-सामने; कधी, कुठे पाहणार सामना?

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज नऊ मे रोजी आयपीएल 2022 मधील 56 वा सामना खेळला जाणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्धातासापूर्वी नाणेफेक होईल.  मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येणार आहे. याशिवाय, मोबाईल ऍप डिस्ने हॉटस्टारही पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त सामन्यातील प्रत्येक अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही एबीपी माझ्याशी कनेक्ट राहा


 

पार्श्वभूमी

MI vs KKR, IPL 2022:  मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज लढत होणार आहे. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याच्या संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर, मुंबईचा संघ तळाशी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालाय. दरम्यान, प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याचा संघ आज मुंबईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 11 सामन्यांत केवळ चार विजयांची नोंद करणाऱ्या कोलकात्याला उर्वरित तीन सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागणार आहेत. दुसरीकडं मुंबईचा संघ केवळ सन्मान वाचवण्यासाठी या स्पर्धेत खेळत आहे. 


मुंबई- कोलकाता हेड टू हेड रेकार्ड
आयपीएल 2022 चा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नवी मुंबईतील डीवायपाटील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळला गेला, ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्स राखून पराभव केला. आयपीएलमध्ये  कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स एकूण 30 सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सनं 22 सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सला केवळ 8 सामन्यांमध्ये पराभव करता आला आहे.


मुंबईचा संभाव्य इलेव्हन:
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय/बेसिल थम्पी, जसप्रीत बुमराह, आर. मेरेडिथ.


कोलकात्याचा संभाव्य इलेव्हन: 
आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, शेल्डन जॅक्सन/बाबा इंद्रजित (विकेटकीपर), आंद्रे रसल, अमन खान/अनुकुल रॉय, सुनील नरायण, टीम साऊथी, उमेश यादव/हर्षित राणा, शिवमहर्षी.


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.