IPL 2022, MI vs KKR, Top 10 Key Points : जसप्रीत बुमराह आणि ईशान किशन यांच्या दमदार खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावे लागले. कोलकात्याने मुंबईचा तब्बल 52 धावांनी पराभव केला. कोलकात्याने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 113 धावांत गारद झाला. आज झालेल्या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात...


मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.  


मुंबईच्या फलंदाजीचा कणा असणारा सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार आहे. सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत रमणदीप सिंहला संधी देण्यात आली. 


कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल गमावला. कोलकात्याच्या संघात तब्बल पाच बदल करण्यात आले. अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले.


जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे प्रथम फंलदाजी करताना कोलकात्याच्या फलंदाजांची दाणादाण उडाली.  कोलकाता संघाने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावांपर्यंत मजल मारली. बुमराहने पाच विकेट घेत कोलकात्याचे कंबरडे मोडले.


कोलकात्याकडून अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर यांनी दमदार सलामी दिली. 5.4 षटकांत त्यांनी 60 धावांची सलामी दिली. वेंकटेश अय्यर 43 धावा काढून माघारी परतला. चार षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने अय्यरने 43 धावा चोपल्या. अय्यरनं अजिंक्य रहाणेही लगेच माघारी परतला. रहणेने 25 धावा काढळ्या. नीतीश राणानेही 43 धावांची खेळी केली. 


कोलकात्याने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 113 धावांत गारद झाला. 


मुंबईच्या संघाला 20 षटकेही खेळता आली नाहीत. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील हा नववा पराभव होय.... 11 सामन्यात मुंबईचा हा नववा पराभव झाला.


सलामी फलंदाज ईशान किशनचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही फंलदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. ईशान किशनने 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तर जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत पाच विकेट घेतल्या होत्या.


कोलकात्याने दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा दोन धावा काढून माघारी परतला. त्यानंतर तिलक वर्माही 6 धावांवर बाद झाला. रमणदीपलाही मोठी खेळी करता आली नाही, तो 12 धावा काढून बाद झाला. टीम डेविड 13 तर पोलार्ड 15 धावा काढून बाद झाले. डॅनिअल सॅम्स 1, एम अश्विन 0, कार्किकेय 3 आणि बुमराह 0 यांना मोठी खेळी करता आली नाही. 


एका बाजूला विकेट पडत असताना ईशान किशनने संयमी फंलदाजी केली. ईशान किशनने 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. कोलकात्याने मुंबईच्यातीन फलंदाजांना धावबाद केले. पोलार्ड, कार्तिकेय आणि बुमराह धावबाद झाला. कोलकात्याकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर आंद्रे रसेलने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय टीम साऊदी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एका गड्याला तंबूत धाडले.