MI vs DC: मुंबईचा स्टार फलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) दिल्लीविरुद्ध चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. या सामन्यात त्यानं दिल्लीच्या तीन महत्वाच्या फलंदाजा आपल्या जाळ्यात अडकवून माघारी धाडलं. जसप्रीत बुमराहसह रमनदीप सिंह (Ramandeep Singh), डेनियल सॅम्स (Daniel Sams) आणि मयंक मार्कंडे (Mayank Markande) आणि चांगली गोंलदाजी केली. ज्यामुळं दिल्लीच्या संघाला 20 षटकात सात विकेट्स गमावून 159 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलनं (Rovman Powell) सर्वाधिक 43 धावा केल्या. 


प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. दिल्लीच्या डावातील तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहनं डेव्हिड वार्नरच्या (5 धावा) रुपात दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर मिचेश मार्शही (0 धाव) डेनियल सॅम्सच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ (24 धावा) आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या करेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, तोही पावर प्लेच्या अखेरच्या षटकात बाद झाला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं सघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही संघाची धावसंख्या पुढे नेता आली नाही. त्यानं 33 चेंडूत 39 धावा केल्या. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलनं सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. ज्यात चार षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता. रोव्हमन पॉवेल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, रमनदीप सिंहला दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, डेनियल्स सॅम्स, मयांक मार्कंडेय यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.


दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन:
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), सरफराज खान, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद.


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: 
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), डेवाल्ड ब्रेविस, तिळक वर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंह, डॅनियल सॅम्स, हृतिक शॉकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे. 


हे देखील वाचा-