IPL 2024 MI Vs DC : गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या मुंबई आणि दिल्ली संघामध्ये आज लढत होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. वानखेडे मैदानावर होणाऱ्या या सामन्यात मुंबईच्या ताफ्यात सूर्या परतलाय, तर दिल्लीचा हुकमी एक्का कुलदीप यादव तंदुरुस्त नसल्याचं वृत्त आहे. वानखेडे मैदानावर मुंबईचं नेहमीच वर्चस्व राहिले आहे. पण दिल्लीकडूनही मुंबईला नेहमीच टक्कर मिळाली आहे. हेड टू हेड, खेळपट्टी, प्लेईंग 11, सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट... दिल्ली आणि मुंबई यांच्यातील सामन्यासंदर्भातील सर्व माहिती जाणून घेऊयात... 

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड (IPL 2024 MI Vs DC Head To Head Record)

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये 33 वेळा आमनासामना झाला आहे. मुंबईने 18 वेळा तर दिल्लीने 15 वेळा विजय मिळवला आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील लढती नेहमीच रोमांचक झाल्या आहेत. मुंबईचा दिल्लीविरोधातील सर्वोच्च स्कोर 218 इतका आहे. तर दिल्लीचा मुंबईविरोधात सर्वोच्च स्कोर 213 आहे. दोन्ही संघातील मागील पाच लढतीमध्ये मुंबईला दोन सामन्यात विजय मिळवता आलाय, तर दिल्लीने तीन सामन्यात बाजी मारली. 2021 आयपीएलमध्ये मुंबईला दिल्लीविरोधात दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. 2023 आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्लीचा दोन वेळा आमनासामना झाला, त्यामध्ये रोहित शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.  

वानखेडेची खेळपट्टी कशी आहे ? (IPL 2024 MI Vs DC Pitch Report)

वानखेडेच्या खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. धावांचा पाठलाग कऱणाऱ्या संघाला या मैदानावर नेहमीच फायदा होतो. या मैदानावर आतापर्यंत 112 आयपीएल सामने झाले आहेत. त्यामधील 62 सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळला आहे. वानखेडेच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, 71 टक्के विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये वानखेडे मैदानावर वेगवान गोलंदाजांनी 877 विकेट घेतल्या आहेत, तर फिरकी गोलंदाजांना 365 विकेट मिळाल्या आहेत. या मैदानावरील सरासरी धावसंख्या 169 इतकी आहे. 

सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर ? (MOST RUNS IN MI VS DC IPL MATCHES)

फलंदाज डाव  धावा Strike Rate सरासरी सर्वोच्च धावसंख्या
रोहित शर्मा (MI) 26 792 128.99 33.00 74*
इशान किशन (MI) 10 423 148.94 70.50 81*
वीरेंद्र सेहवाग (DC) 10 375 156.90 41.66 95*

सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या ? (MOST WICKETS IN MI VS DC IPL MATCHES)

गोलंदाज डाव विकेट Econ. सरासरी सर्वोत्तम
जसप्रीत बुमराह (MI) 19 23 7.55 23.43 4/14
लसीथ मलिंगा (MI) 13 22 6.65 14.22 5/13
हरभजन सिंह (MI) 17 21 6.67 20.19 4/17

दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 11 पाहूयात IPL 2024 MI Vs DC Probable Playing 11
 
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11 (MI Probable Playing 11)

हार्दिक पंड्या (कर्णधार),रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, मोहम्मद नबी, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला, गेराल्ड कोएत्जी, टिम डेविड, आकाश मधवाल,   

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेईंग 11 (DC Probable Playing 11 )

पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसीख डार सलाम, एनरिक नॉर्खिया, ईशांत शर्मा, खलील अहमद, जेक फ्रेजर मॅकगर्क 

दिल्लीचे शिलेदार कोणते ?

अभिषेक पोरेल, अॅनरिक नॉर्खे, अक्षर पटेल, डेविड वॉर्नर, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, ललीत यादव, लुंगी एनगिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रविण दुबे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, खलील अहमद, विकी ओत्सवाल, यश धुल, कुमार कुशगरा ,झाय रिचर्डसन,हॅरी ब्रूक,सुमित कुमार,शाय होप,ट्रिस्टन स्टब्स, राशीख दर, रिकी भूई ,स्वस्तिक चिकारा  
 
मुंबईच्या संघात कोण ?

आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड , शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (कर्णधार), गेराल्ड कोएत्जी,नुवान तुषारा,दिलशान मधुशंका, मोहम्मद नबी,श्रेयस गोपाल, नमन धीर, अंशुल कंबोज,शिवालीक शर्मा