MI vs DC Dream 11 Prediction Match 20th : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या तळाच्या संघाचा आमनासामना होणार आहे. दोन्ही संघाला अद्याप आयपीएलमध्ये सूर गवसलेला नाही. दिल्लीला चार सामन्यात फक्त एक विजय मिळला आहे, तर मुंबईचा सलग तीन सामन्यात पराभव झाला आहे. पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणारा मुंबईचा संघ आज विजय मिळवणार का? याकडे चाहत्यांचा नजरा लागल्या आहेत.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईला यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची अद्याप प्रतिक्षाच आहे. दिल्लीचा पराभव करत मुंबई पहिल्या जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. आजच्या सामन्यावेळी अनेकजण फॅन्टेसी टीम तयार करत पैज लावतील. त्याचाच एक भाग म्हणून आम्हीही तुम्हाला टीम तयार करुन देत आहोत. पाहा मालामाल करणारे 11 खेळाडू ( MI vs DC Dream 11 Prediction Match 20th )
मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यादरम्यान ड्रीम 11 प्रिडिक्शन ( MI vs DC Dream 11 Prediction Match 20th )
विकेटकीपर: ऋषभ पंत ( Rishabh Pant ), ईशान किशन ( Ishan Kishan ).
फलंदाज : रोहित शर्मा ( Rohit Sharma ), डेविड वार्नर ( David Warner ), सूर्यकुमार यादव ( Surya Kumar Yadav ), तिलक वर्मा ( Tilak Verma ).
अष्टपैलू : मिचेल मार्श ( Mitchell Marsh ), हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ).
गोलंदाज : जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ), खलील अहमद ( Khaleel Ahmed ).
कर्णधार : Choice 1:
डेविड वार्नर ( David Warner )
उपकर्णधार :
मिचेल मार्श ( Mitchell Marsh )
कर्णधार: Choice 2:
सूर्यकुमार यादव ( Surya Kumar Yadav )
उपकर्णधार :
ऋषभ पंत ( Rishabh Pant ).
वानखेडेची खेळपट्टी कशी आहे ? (IPL 2024 MI Vs DC Pitch Report)
वानखेडेच्या खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. धावांचा पाठलाग कऱणाऱ्या संघाला या मैदानावर नेहमीच फायदा होतो. या मैदानावर आतापर्यंत 112 आयपीएल सामने झाले आहेत. त्यामधील 62 सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजय मिळला आहे. वानखेडेच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, 71 टक्के विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये वानखेडे मैदानावर वेगवान गोलंदाजांनी 877 विकेट घेतल्या आहेत, तर फिरकी गोलंदाजांना 365 विकेट मिळाल्या आहेत. या मैदानावरील सरासरी धावसंख्या 169 इतकी आहे.
नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात.
आणखी वाचा :
मुंबई-दिल्ली कोण वरचढ, कुणाच्या सर्वाधिक धावा, कुणाच्या सर्वाधिक विकेट? A टू Z माहिती