DC vs MI, IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. मैदान चांगलं आहे, दिवसाचा सामना असल्यामुळे दव पडणार नाही, त्यामुळे प्रथम फलंदाजी करायची होती, असं नाणेफेकीवेळी ऋषभ पंत यानं सांगितलं. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे. दिल्लीने आपल्या ताफ्यात दोन बदल केले आहेत, तर मुंबईच्या ताफ्यात एक बदल करण्यात आलाय.
दिल्ली आणि मुंबईच्या संघात कोण कोणते बदल ?
दिल्लीच्या ताफ्यात दोन बदल करण्यात आले आहे. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ याला बेंचवर बसवण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉ यानं आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. महत्वाच्या सामन्यात पंतची कमी दिल्लीला जाणवणार आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया यालाही दिल्लीनं बेंचवर बसवलं आहे. यंदा नॉर्खियाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला विकेट घेण्यात अपयश आलेच, त्याशिवाय धावाही रोखता आल्या नाहीत. एनरिख नॉर्खियाच्या जागी दिल्लीने आज लिजाद विलिअम्स याला संधी दिली आहे.
मुंबईच्या संघात एक महत्वाचा बदल कऱण्यात आला आहे. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोइत्जे याला प्लेईंग 11 मधून बाहेर बसवण्यात आले आहे. मुंबईने आज लूकी वूड याला पुन्हा एकदा स्थान दिलेय. लूकी वूड याने सुरुवातीच्या सामन्यात भेदक मारा केला होता.
दिल्ली कॅपिटल्सची Playing XI:
कुमार कुशाग्रा, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, मुकेश कुमार, लिजाद विलिअम्स
इम्पॅक्ट सब - रसीख, दुबे, ओत्सवाल, रिकी भुई, सुमित कुमार
मुंबई इंडियन्सची Playing XI:
रोहित शर्मा, इशान किशन, नेहाल वेढेरा, तिलक वर्मा, नेहाल वढेरा हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी पीयूष चावला, लूकी वूड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
Potential subs: सूर्यकुमार यादव, नमन धीर, सॅम्स मुलानी, ब्रेविस, कुमार कार्तिकिय