Mayank Yadav to miss 7 matches for LSG : आयपीएल २०२५ हंगाम सुरू होण्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्स (LSG) ला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याशिवाय, मयंक यादव, आवेश खान आणि आकाश दीप हे देखील काही सामन्यांमधून बाहेर पडतील.
मयंक यादवच्या दुखापतीबद्दल अपडेट
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मयंक यादव गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सेंटर ऑफ एक्सलन्स (NCA) येथे पुनर्वसन करत आहे. तो आयपीएल 2025च्या पहिल्या दोन-तीन आठवडे बाहेर असेल आणि 15 एप्रिलपर्यंत तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ तो पहिल्या सात सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.
लखनौ सुपर जायंट्स (LSG) साठी दिलासादायक बातमी आहे की, मिचेल मार्श आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसणार आहे. पण, तो या हंगामात फक्त फलंदाज म्हणून खेळेल आणि गोलंदाजी करणार नाही. संघाचा कर्णधार ऋषभ पंतसाठी ही निश्चितच दिलासादायक बातमी आहे. मार्श गेल्या तीन हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता, परंतु दुखापतींमुळे त्याचा प्रवास संघर्षपूर्ण होता. गेल्या हंगामात हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे तो फक्त चार सामने खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियात परतला.
आकाश दीप आणि आवेश खानही जाणार बाहेर...
आकाश दीप आणि आवेश खान हे देखील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे त्यांच्या दुखापतींमधून बरे होत आहेत. हे दोन्ही खेळाडू एलएसजीच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये उपलब्ध नसतील. पण, ते 4 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे.
आयपीएल 2025 साठी लखनौ सुपर जायंट्स संघ
फलंदाज : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), एडेन मार्करम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, मॅथ्यू ब्रीट्झके (यष्टीरक्षक), आर्यन जुयाल (यष्टीरक्षक), हिम्मत सिंग, मिशेल मार्श.
अष्टपैलू खेळाडू : शाहबाज अहमद, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शीन कुलकर्णी.
गोलंदाज : मोहसिन खान, रवी बिश्नोई, मयंक यादव, आवेश खान, आकाश दीप, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंग राठी, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव.
हे ही वाचा -