LSG vs KKR, IPl 2022 Marathi News : जागतिक मातृदिनाच्या पूर्वसंध्येला लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यात लखनौच्या जर्सीवरील नावात बदल करण्यात आला आहे. जागतिक मातृदिनाचे औचित्य साधत लखनौच्या खेळाडूंनी जर्सीवर आपल्या आईचे नाव टाकलेय. आज लखनौचे खेळाडू आईचं नाव असलेली जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत.


यंदा 8 मे रोजी जागतिक मातृदिन (Mother's Day)  साजरा केला जाणार आहे. हा दिवस आईसाठी, आपल्या आयुष्यातील आईचे महत्त्व समजून घेण्यासाठी साजरा केला जातो. याचेच औचित्य साधत लखनौच्या संघाने आपल्या खेळाडूच्या जर्सीवर आईचे नाव टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाताविरोधात या जर्सीसोबत लखनौचे खेळाडू मैदानावर उतरणार आहे. लखनौ संघाने ट्विट करत जर्सीचे फोटोही पोस्ट केले आहेत. 


पाहा लखनौ संघाचे ट्विट -






 आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 53 वा सामना पुण्यातील एमसीए मैदानात खेळवला जात आहे. लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (LSG vs KKR) या दोन संघात पार पडणाऱ्या या सामन्यात केकेआरने नुकतीच नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा करण्याच निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा गोलंदा उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे. लखनौ सुपरजायंट्सने देखील त्यांच्या संघात एक बदल केला असून वेगवान गोलंदाज आवेश खानला पुन्हा संघात घेण्यात आलं असून अष्टपैलू कृष्णपा गौथमला विश्रांती देण्यात आली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...


लखनौ अंतिम 11 -
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, दीपक हुडा,मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, दुश्मंता चमिरा, मोहसिन खान, आवेश खान, रवी बिश्नोई 


कोलकाता अंतिम 11  - 
आरोन फिंच, नितीश राणा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नारायण, बाबा इंद्रजीत, अनुकूल रॉय, टिम साउदी, हर्षित राणा, शिवम मावी