LSG vs RR LIVE Updates: राजस्थानचा लखनौवर 24 धावांनी विजय
LSG vs RR LIVE Updates: राजस्थानचा लखनौवर 24 धावांनी विजय
Advertisement
LSG vs RR LIVE Updates: लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएल 2022 मधील 63 वा सामना खेळला जाणार आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 15 May 2022 11:00 PM
LSG vs RR LIVE Updates: राजस्थानविरुद्ध दीपक हुडाचं अर्धशतक
राजस्थानविरुद्ध सामन्यात लखनौच्या संघांची खराब सुरुवात झाली आहे. राजस्थाननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या फलंदाजांनी पाठोपाठ विकेट्स गमावले. त्यानंतर दीपक हुडानं संयमी खेळी दाखवत अर्धशतक ठोकलं आहे.
दीपक हुड्डा आणि क्रृणाल पांड्या यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांची जोडी जमली होती. पण आर अश्विन यांने क्रृणाल पांड्याला बाद करत राजस्थानला चौथं यश मिळवून दिले. क्रृणाल पांड्या 25 धावा काढून बाद झाला.
LSG vs RR LIVE Updates: लखनौची खराब सुरुवात, केएल राहुलच्या रुपात संघाला तिसरा झटका
दिल्लीनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. केएल राहुलच्या रुपात लखनौच्या संघाला तिसरा झटका बसला आहे.
LSG vs RR LIVE Updates: लखनौची भेदक गोलंदाजी, राजस्थानचे तीन फलंदाज माघारी परतले
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं तीन विकेट्स गमावले आहे. सलामीवीर जोस बटलर, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन माघारी परतले आहेत.
LSG vs RR LIVE Updates: यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसननं संघाचा डाव सावरला
राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर आऊट झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅससननं संघाचा डाव सावरला आहे. यशस्वी जैस्वाल 22 चेंडूवर 37 धावा करून तर, संजू सॅमसन 21 चेंडूत 31 धावा करून क्रीजवर उपस्थित आहेत.
LSG vs RR LIVE Updates: लखनौ-गुजरात यांच्यातील सामन्याला सुरुवात
लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थानच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर सलामी देण्यासाठी मैदानात आले आहेत.
LSG vs RR LIVE Updates: राजस्थानच्या संघानं नाणेफेक जिंकलं, प्रथम फलंदाजी करणार
LSG vs RR, IPL 2022: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा 2022 मधील 62 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला आहे.
पार्श्वभूमी
LSG vs RR LIVE Updates: लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएल 2022 मधील 63 वा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी लखनौचा संघ मैदानात उतरणार आहे. तर, प्लेऑफचं आव्हान टिकवण्यासाठी राजस्थानचा संघ लखनौशी भिडणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ 16 गुणांसह (+0.385) दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या हंगामात राजस्थानच्या संघानं 12 सामन्यांपैकी सात सामने जिंकले आहेत. त्यांचे 14 गुण आहेत. आजच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर राजस्थानसाठी पुढील सामना त्यांच्यासाठी करो या मरोचा असेल.
राजस्थानच्या संघाला त्यांच्या मागच्या सामन्यात आठ विकेटनं पराभव स्वीकारावा लागला होता. लखनौविरुद्ध विजय मिळवून राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा त्यांचा दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. राजस्थानसाठी जोस बटलरने 12 सामन्यांमध्ये तीन शतके आणि अर्धशतकांच्या मदतीने 625 धावा केल्या आहेत. कर्णधार संजू सॅमसननं आतापर्यंत 12 सामन्यात दोन अर्धशतकांच्या मदतीनं 327 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो? हे सामन्याच्या शेवटीच स्पष्ट होईल.
लखनौ- राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना कधी, कुठे पाहायचा? लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 15 मे रोजी आयपीएलचा 62 वा सामना खेळला जाणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा साममना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याला आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल, तर या सामन्याचा अर्धातासपू्र्वी म्हणजेच 7 वाजता नाणेफेक होईल.