LSG vs RR, IPL 2022: राजस्थानच्या भेदक गोलंदाजीसमोर लखनौच्या संघाची (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) दमछाक झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या राजस्थानच्या संघानं लखनौसमोर 179 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत लखनौच्या संघाला 154 धावांवर रोखलं. लखनौकडून दीपक हुडानं सर्वाधिक 59 धावांची खेळी केली. राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult), प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि ओबेड मेकॉयच्या (Obed McCoy) भेदक माऱ्यासमोर लखनौच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. तसेच राजस्थानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला.


राजस्थान- लखनौ सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे-


- या सामन्यात राजस्थानच्या संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 


- राजस्थानच्या डावातील तिसऱ्याच षटकात सलामीवीर जोस बटलरला बाद करून लखनौनं मजबूत पकड बनवली


- त्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वालनं संघाचा डाव सावरला. दोघांत 64 धावांची भागेदारी झाली. 


- संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वालला बाद करून लखनौच्या संघानं सामन्यात कमबॅक केलं. 


- राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 178 धावा केल्या.लखनौकडून रवी बिश्नोईनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, आवेश खान, जेसन होल्डर आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे. 


- राजस्थानच्या संघानं दिलेल्या 179 लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौच्या संघाची तारांबळ उडाली.


- राजस्थानच्या गोलदांजांनी भेदक गोलंदाजी करत 29 धावांवर लखनौचे तीन फलंदाज तंबूत पाठवत सामना आपल्या बाजूनं झुकवला


- त्यानंतर लखनौचा फलंदाज दीपक हुडानं सामना संघाचा डाव सावरत सामना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्रेन्ट बोल्टनं त्याला आपल्या जाळ्यात फसवलं. 


- दीपक हुडा बाद झाल्यानंतर  क्रुणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिसनं लखनौला सामना जिंकवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, तेही अपयशी ठरले.


- लखनौच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 154 धावा करता आल्या.


- राजस्थानकडून ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मेकॉयनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, युजवेंद्र चहल आणि रवीचंद्रन अश्वीन यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट जमा झाली. 


हे देखील वाचा-