LSG vs PBKS, IPL 2023 : पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे . पंजाबकडून आज सॅम करन नेतृत्व करत आहे. शिखर धवन दुखापतग्रस्त असल्यामुळे आज तो मैदानात उतरणार नाही.  शिखर धवन यंदा भन्नाट फॉर्मात आहे. दुखापतग्रस्त झाल्यामुळे पंजाबला मोठा धक्का बसलाय. तर दुसरीकडे लखनौकडून आज युधवीर सिंह पदार्पण करत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर केएल राहुलचा लखनौ संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. दोन्ही संघात काही बदल करण्यात आले आहेत. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन...


लखनौची प्लेईंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, क्रुणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, अवेश खान, युद्धवीर सिंह चरक, मार्क वूड, रवि बिश्नोई


पंजाब किंग्सच्या संघात कोण कोण :
 अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंह भाटिया, सिकंदर रजा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम करन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह


 









दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली ?


आयपीएल 2023 मध्ये, लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. लखनौ संघाने आयपीएलच्या 16 व्या मोसमात चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले असून एका सामन्याता त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौने विजयासह आयपीएल 2023 चा प्रवास सुरू केला. पहिल्या सामन्यात लखनौने दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याचा पराभव झाला. मात्र, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचे सामने जिंकून लखनौने आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन केलं.  पंजाब किंग्स संघानेही आयपीएल 2023 मध्ये विजयी सुरुवात केली. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील कोलकाता विरुद्धचा पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर राजस्थान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही पंजाबने बाजी मारली. पण त्यानंतर सलग दोन सामन्यात पंजाबचा पराभव झाला. तिसऱ्या सामन्यात हैदराबाद आणि चौथ्या सामन्यात गुजरातकडून पंजाबला पराभव पत्करावा लागला होता. 


पिच रिपोर्ट –


लखनौ आणि पंजाब यांच्यातील सामना श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. इकानाची खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. अशात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. 


हेड टू हेड –


लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आतापर्यंत एक सामना झाला आहे. या सामन्यात लखनौने 20 धावांनी विजय मिळवला होता.