IPL Eliminator 2022 : आयपीएल 2022 (Ipl 2022) स्पर्धेच्या एलिमेनेटर सामन्यात विजय मिळवत रॉयल चँलेजर्स बंगळुरुने थेट क्वॉलीफायर दोन मध्ये धडक घेतली आहे. बंगळुरु आणि लखनौ दोन्ही संघाकडून दमदार खेळाचं प्रदर्शन यावेळी दाखवण्यात आलं, पण बंगळुरुच्या रजत पाटीदारने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर बंगळुरुचा विजय सोपा झाला.दरम्यान या शतकी खेळीवेळीच रजतने लखनौचा अनुभवी फिरकीपटू कृणाल पांड्याच्या एका षटकात तब्बल 20 रन ठोकले होते. ज्यात चौकार आणि षटकारांचाही समावेश होता.
लखनौचा कर्णधार केएल राहुलने आधी गोलंदाजी निवडल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाला प्रथम फलंदाजी करावी लागील. यावेळी पॉवरप्लेमधील शेवटची ओव्हर घेऊन अनुभवी फिरकीपटू कृणाल पांड्या आला. त्याचवेळी आरसीबीकडून रजत पाटीदार क्रिजवर होता. याच षटकात रजतने तीन चौकार आणि एक षटकार ठोकत 20 धावा केल्या, ज्याच्या जोरावर संघाने 50 धावांचा आकडा सहज पार केला. सलामीवीर आणि कर्णधार फाफ शून्यावर बाद झाल्यानंतर रजतने संघाचा डाव सांभाळला.
व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
सामन्याचा लेखा-जोखा
नाणेफेक जिंकून लखनौचा कर्णधार राहुलने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर बंगळुरुची सुरुवात खराब झाली. सलामीवीर आणि कर्णधार फाफ शून्यावर बाद झाल्यानंतर रजतने संघाचा डाव सांभाळला. रजतने दमदार असं शतक लगावल्याने आरसीबीने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 207 धावा केल्या. पाटीदार आणि कार्तिकच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावरच हा धावांचा डोंगर उभा केला. 208 धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला क्विंटन डिकॉक अवघ्या सहा धावा काढून बाद झाला. संघाकडून केवळ राहुल आणि दीपक हुड्डा यांनी चांगली फलंदाजी केली. 61 चेंडूत 96 धावांची भागिदारी दोघांनी केली. दीपक हुड्डा 26 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला. तर राहुलही 79 धावांवर बाद धाला. ज्यानंतर अखेरच्या षटकात लुईसला लखनौला विजय मिळवून देण्यात अपयश आले आणि आरसीबीचा 14 धावांनी विजय झाला.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : पाटीदारचं शतक, हेजलवूडचा भेदक माऱ्याच्या जोरावर आरसीबीचा विजय, लखनौचं आव्हान संपले
- IPL 2022: मिलरनं मोडला रोहित-पोलार्डचा खास रेकॉर्ड! जाडेजाच्या विक्रमाशी बरोबरी, लवकरच धोनीलाही टाकणार मागं
- 'गुजरातविरुद्ध संजू सॅमसन 47 धावा करणार' त्या व्यक्तीची भविष्यवाणी ठरली खरी, आता विराटबाबत म्हणतोय...