IPL 2024, KKR vs LSG : कोलकात्याचा (Kolkata Knight Riders) कर्णधार श्रेयस अय्यर यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकात्यामधील ईडन गार्डन मैदानावर लखनौ आणि केकेआर यांच्यामध्ये सामना होणार आहे. केएल राहुलचा लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants ) संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. कोलकात्याच्या ताफ्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. कोलकात्याकडून रिंकू सिंह याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्यात आले आहे. दुसरीकडे लखनौच्या ताफ्यात महत्वाचे बदल करण्यात आले आहे. देवदत्त पड्डीकल, नवीन उल हक यांना बेंचवर बसवण्यात आले आहे. 


लखनौच्या ताफ्यात बदल - 


ईडन गार्डन मैदानावर लखनौ संघाला प्रथम गोलंदाजी करायची होती. लखनौच्या ताफ्यात काही मोठे बदल करण्यात आले आहे. देवदत्त पडीक्कल याला आराम देण्यात आला आहे. त्याच्याजागी दीपक हुड्डा याला स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे नवीन उल हक यालाही बेंचवर बसवण्यात आले आहे. त्याच्याजागी शेमार जोसेफ याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलेय. मोसीन खान याचेही प्लेईंग 11 मध्ये कमबॅक झालेय. 






लखनौची प्लेईंग 11 - 


केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिसल निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, रवि बिश्नो, शमार जोसेफ, यश ठाकूर, मोसीन खान 


राखीव खेळाडू - अर्शद खान, प्रेरक मंकाड, एम सिद्धार्थ, अमित मिश्रा, के गौतम


Lucknow Super Giants XI: KL Rahul (c & wk), Quinton de Kock, Deepak Hooda, Marcus Stoinis, Nicholas Pooran, Ayush Badoni, Krunal Pandya, Ravi Bishnoi, Yash Thakur, Shamar Joseph, Mohsin Khan


LSG bench: Arshad Khan, Prerak Mankad, M Siddharth, Amit Mishra, K Gowtham


कोलकात्याच्या प्लेईंग 11 मध्ये कोण कोण ?


फिलीप साल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगरिक्ष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा


राखीव खेळाडू  - रिंकू सिंह, सुयेश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, गुरबाज


Kolkata Knight Riders XI: Phil Salt (wk), Sunil Narine, Venkatesh Iyer, Shreyas Iyer (c), Angkrish Raghuvanshi, Andre Russell, Ramandeep Singh, Mitchell Starc, Vaibhav Arora, Varun Chakravarthy, Harshit Rana