LSG vs KKR : पुण्यातील एमसीए मैदानात सुरु असणाऱ्या लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (LSG vs KKR) सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्याच षटकात केकेआरला एक मोठं यश मिळालं. केकेआरने लखनौचा कर्णधार केएल राहुलला एकही धाव न करता बाद केलं आहे. यावेळी केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने एक अप्रतिम असा थ्रो करत राहुलला धावचीत केलं. त्यामुळे राहुल एकही चेंडू न खेळताच तंबूत परतला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामातील राहुलचा हा तिसरा डक आहे, याचा अर्थ तिसऱ्यांदा तो शून्यावर यंदाच्या हंगामात बाद झाला आहे. 

Continues below advertisement



नेमकं काय घडलं?


लखनौ आणि कोलकाता सामन्यातील पहिलं षटक सुरु होतं. स्ट्राईकवर डी कॉक असून राहुल नॉनस्ट्राईकवर होता. अशावेळी षटकाचा पाचवा चेंडू डी कॉकने मारला तो धाव घेण्यासाठी धावला पण त्याचं आणि राहुलमध्ये योग्य ताळमेळ न बसल्याने त्यांनी धाव घेणं कॅन्सल करत राहुल पुन्हा नॉनस्ट्राईकच्या दिशेने पळाला. त्याचवेळी श्रेयसने अचूक थ्रो टाकला जो बरोबर स्टम्प्सना लागला आणि राहुल धावचीत झाला.  


व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा


दोन्ही संघात एक-एक बदल


आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम 11 चा विचार करता कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा गोलंदा उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे. लखनौ सुपरजायंट्सने देखील त्यांच्या संघात एक बदल केला असून वेगवान गोलंदाज आवेश खानला पुन्हा संघात घेण्यात आलं असून अष्टपैलू कृष्णपा गौथमला विश्रांती देण्यात आली आहे.  


हे देखील वाचा-