PBKS Vs RR, IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर  (Wankhede Stadium) पंजाब किंग्ज आणि राजस्थान यांच्यात (Punjab Kings Vs Rajasthan Royals) आयपीएल 2022चा 52 सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पंजाबकडून जॉनी बेअरेस्टोनं (Jonny Bairstow) 40 चेंडूत 56 धावांची खेळी केली.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, पंजाबच्या डावातील सहाव्या षटकात आर अश्विनच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेल बाद झाला. त्यानंतर बेअरस्टो आणि भानुका राजपक्षेनं संघाचा डाव सावरत पुढे नेला. मात्र, दहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर भानुका राजपक्षेनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर मैदानात आलेल्या पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला. या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. पण प्रसिद्ध कृष्णानं त्याला बाद करून पंजाबच्या संघाला मोठा धक्का दिला. दरम्यान, जितेश शर्मा आणि ऋषी धवननं संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. जितेश शर्मानं 18 चेंडूत 38 धावा तर, ऋषी धवननं 2 चेंडूत 5 धावा केल्या.  पंजाबच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून राजस्थानसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या आहेत. तर, प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विनला यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे. 


राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन: 
जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार,विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.


पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन:
जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा.


हे देखील वाचा-