GT vs MI : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या 51 व्या सामन्यात मुंबईने गुजरातला 5 धावांनी मात दिली. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात गुजरातची सुरुवात चांगली झाली होती. निर्धारीत लक्ष्याचा पाठलाग करताना ते उत्तम कामगिरी करत होते, पण अखेरच्या षटकात डॅनियस सॅम्सने अप्रतिम ओव्हर टाकत मुंबईला विजय मिळवून दिला. पण या अखेरच्या ओव्हरपूर्वी 17 व्या षटकात मुंबईच्या ईशान किशनच्या अप्रतिम यष्टीरक्षणाने सामन्याची दिशा बदलली. यावेळी ईशानची किंपिंग पाहून भारताचा माजी यष्टीरक्षक एमएस धोनीची आठवण साऱ्यांनाच झाली. ईशानने या गुजरातच्या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना धावचीत केलं.


ईशानची शानदार विकेटकीपिंग


ईशान किशनने 18 व्या षटकात आधी हार्दिक पांड्याला धोनीच्या खास अंदाजात धावचीत केलं. त्यांतर देखील गुजरातसाठी फिनिशरचा रोल करणारा राहुल तेवतिया क्रिजवर होता. त्याला बाद करणं मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. यावेळी अखेरच्या षटकात डॅनियल सॅम्स क्रिजवर असताना तिसऱ्या चेंडूवर ईशानने तेवतियालाही धावचीत करत सामना मुंबईच्या पारड्यात झुकवला.



अखरेच्या षटकातील थरार


गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतियासारखे स्फोटक फलंदाज क्रीजवर उपस्थित होते. अशा स्थितीत गुजरातचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं अखेरच्या षटकात डॅनियल सॅम्सच्या हातात चेंडू सोपवला. या षटकातील पहिला चेंडू डॅनियलनं स्लो टाकला. या चेंडूवर मिलरला एकच धाव मिळाली. डॅनियलने दुसरा चेंडू वाइड ऑफ ऑफच्या बाहेर ठेवला, ज्यावर तेवतियाला एकही धाव घेता आली नाही. पुढच्या चेंडूवर तेवतियाने डीप-मिडविकेटवर शॉट खेळला. एक धाव सहज पूर्ण झाली पण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. आता शेवटच्या तीन चेंडूवर गुजरातला विजयासाठी सात धावांची आवश्यकता होती. डॅनियलच्या समोर राशिद खान होता. डॅनियलने हा चेंडूही बाहेर ठेवला, ज्यावर रशीद फक्त एक धाव घेऊ शकला. यानंतर डॅनियलनंच्या अखेरच्या दोन चेंडूवर मिलरला एकही धाव काढता आली नाही. अखेर मुंबईने हा सामना 5 धावांनी जिंकला.


हे देखील वाचा-