KKR vs SRH, IPL 2024 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामना आहे. पंजाब आणि दिल्ली (PBKS vs DC) यांच्यात पहिला सामना झाला. तर आज दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराजयर्स हैदराबाद यांच्यामध्ये होत आहे. सनरायजर्स हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान कोलकाता संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. कोलकात्याकडून फील साल्ट आणि मिचेल स्टार्क यांनी पदार्पण केले आहे.


कोलकाता नाइट रायडर्सची  प्लेईंग 11  : 


फील सॉल्ट (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, मिचेल स्टार्क, रमणदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.


Kolkata Knight Riders: 1 Venkatesh Iyer, 2 Phil Salt (wk), 3 Shreyas Iyer (capt), 4 Rinku Singh, 5 Nitish Rana, 6 Sunil Narine, 7 Andre Russell, 8 Ramandeep Singh, 9 Mitchell Starc, 10 Harshit Rana, 11 Varun Chakravarthy


कोलकात्याचे इम्पॅक्ट प्लेअर - सुयेश शर्मा, ओरारा, गुरबाज, मनिष पांडे 


सनरायजर्स हैदराबादची  प्लेईंग 11  :


मयांक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्क्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, पॅट कमिन्स (कर्णधार), शहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयांक मार्कंडे


इम्पॅक्ट प्लेअर - रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, उमरान मलीक, अभिषेक


Sunrisers Hyderabad: 1 Mayank Agarwal, 2 Rahul Tripathi, 3 Aiden Markram, 4 Heinrich Klaasen (wk), 5 Abdul Samad, 6 Shahbaz Ahmed, 7 Marco Jansen, 8 Pat Cummins (capt), 9 Bhuvneshwar Kumar, 10 Mayank Markande, 11 T Natarajan


 





हेड टू हेड - 


आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात 25 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये 16 सामन्यात कोलकात्याने विजय मिळवलाय. हैदराबादला फक्त नऊ सामन्यातच बाजी मारता आली आहे. आजच्या सामन्यातही केकेआरचं पारडे जड दिसतेय. रहमनुल्लाह गुरबाज, श्रेयस अय्यर, नितीश राणा आणि रिंकू सिंह यासारखे स्फोटक फलंदाज आहेत. तर हैदाराबादकडेही ट्रेविस हेड, एडन मार्क्रम, हेनरिक क्लासेन यासारखे फलंदाज आहेत. त्यामुळे सामना रंगतदार होऊ शकतो.