KKR vs RCB : आयपीएलमधील कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना रद्द करण्यात आला आहे. हा सामना रिशेड्यूल करण्याच येईल. कोलकाताच्या संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे इतर खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं आजचा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काही खेळाडू आजारी असल्याचंही सांगितलं जात आहे. 


आयपीएलच्या मैदानात आज  कोलकाता विरुद्ध आरसीबी या संघांमध्ये सामना खेळवण्यात येणार होता. परंतु, हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा सामना रिशेड्यूल करण्यात येणार आहे. कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरिअर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तर संघातील इतर खेळाडू विलगीकरणात आहेत. तसेच संघातील काही खेळाडू आजारी असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळेच हा सामना रद्द करण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाताच्या संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरिअर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तर पेंट कमिंससह इतर 5 खेळाडू आजारी आहेत. तसेच उर्वरित खेळाडूंना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. 


पाहा व्हिडीओ : आयपीएलवर कोरोनाचं सावट, आजचा सामना रद्द 



आतापर्यंत खेळवण्यात आले 29 सामने 


आयपीएलच्या टी20 टूर्नामेंटमध्ये या सीझनमध्ये 29 सामने खेळवण्यात आले आहेत. याचं आयोजन बायो सिक्योर एन्वायरमेंटमध्ये करण्यात येत आहे. ज्यामध्ये खेळाडूंवर बाहेर येण्या-जाण्यासाठी बंदी असते. त्याचप्रमाणे इतरही अनेक बंधन लादण्यात आलेली असतात. दरम्यान, आतापर्यंत आयपीएलच्या आयोजनात कोणतीही बाधा आली नव्हती. आयपीएल किंवा बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


बीसीसीआयनं कठोर केले होते बायो बबलचे नियम


भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने काही दिवसांपूर्वी बायो बबलचे नियम कठोर केले होते. खेळाडूंच्या दर दोन दिवसांनी कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. तसेच खेळाडूंना हॉटेलबाहेरुन जेवण आणण्यासाठीही मनाई केली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2021 : 'विराट'सेनेचा बदलला रंग, RCBनं उचलंलं 'हे' मोठं पाऊल