Glenn Maxwell RCB, IPL 2024 : आयपीएलमध्ये आधीच खराब कामगिरी करणाऱ्या आरसीबीला आणखी एक धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल पुढील काही सामन्यासाठी उपलब्ध नसेल. मागील सामन्यात खराब फॉर्ममुळे मॅक्सवेल यांनं स्वत:ला प्लेईंग 11 बाहेर ठेवलं होतं. कोलकात्याविरोधात आरसीबीच्या ताफ्यात ग्लेन मॅक्सवेल नसणार आहे. मॅक्सवेल यानं आयपीएलमधून माघार घेतली, पण तो दुसऱ्या संघात खेळण्यासाठी पोहचला आहे. आयपीएलमधून ब्रेक घेऊन ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या लीगमध्ये खेळणार असल्याचं वृत्त समोर आलेय. रिपोर्ट्सनुसार, ग्लेन मॅक्सवेल अमेरिकात होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळणार आहे. मॅक्सवेलनं वॉशिंगटन फ्रीडमसोबत करार केला आहे. 


अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धाची सुरुवात विश्वचषकानंतर म्हणजे चार जुलैपासून होणार आहे. ग्लेन मॅक्सवेल या स्पर्धेत वॉशिंगटन फ्रीडम संघासाठी खेळणार आहे. या संघासोबत याआधीच स्टिव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड आहेत. आता वॉशिंगटन फ्रीडम संघाने मॅक्सवेलसोबत करार केला आहे. ग्लेन मॅक्सवेल पहिल्यांदाच वॉशिंगटन फ्रीडम संघासोबत खेळणार आहे. याबाबत बोलताना मॅक्सवेल म्हणाला की, पहिल्यांदा मी ही स्पर्धा पाहिली तेव्हा एक दिवस यामध्ये खेळणार असं म्हटलं होतं. आता हा योग जुळून आला आहे. मागील काही दिवसांपासून मी रिकी पाँटिंग आणि अन्य खेळाडूंसोबत चर्चा केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी उस्तुक आहे. 
 
ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमध्ये यंदा खराब फॉर्मात आहे. मॅक्सवेल याची बॅट अद्याप तळपलेली नाही. त्यात आरसीबीने सात सामन्यातील सहा सामने गमावले आहे. गुणतालिकेत आरसीबी दहाव्या क्रमांकावर आहे. मॅक्सवेल फ्लॉप झाल्याचा फटका आरसीबीलाही बसल्याचं दिसत आहे. सहा सामन्यात फ्लॉप गेल्यानंतर मॅक्सवेल यानं ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. रिपोर्ट्सनुसार, ग्लेन मॅक्सवेल पुढील काही सामन्याला उपलब्ध नसेल. 


यंदाच्या हंगामात ग्लेन मॅक्सवेल याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मॅक्सवेल याला सहा सामन्यात फक्त 32धावा करता आल्या. यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 28 इतकी आहे. तीन सामन्यामध्ये मॅक्सवेल याला खातेही उघडता आले नाही. दोन सामन्यात फक्त चार धावा करता आल्यात. ग्लेन मॅक्सवेल फ्लॉप झाल्याचा फटका आरसीबीलाही बसलाय. आरसीबीला फक्त एक विजय मिळवता आलाय. गुणतालिकेत आरसीबीचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे.  


आयपीएल 2024 मध्ये मॅक्सवेलच्या नावावर फक्त 32 धावा, कुणाविरोधात किती खेळला ?


CSK vs शून्य
PBKS vs 3 धावा
KKR vs 28 धावा
LSG vs शून्य
RR vs  एक धाव
MI vs  शून्य