IPL 2024 Orange And Purple Cap Update : आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. रनमशीन विराट कोहली यानं आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक धावांचा पाऊस पाडलाय. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत विराट कोहली अव्वल स्थानावर विराजमान आहे. दुसरीकडे पर्पल कॅपची लढत मात्र रोमांचक झाली आहे. प्रत्येक सामन्यानंतर पर्पल कॅप वेगळ्याच गोलंदाजाकडे जातेय. सामन्यागणिक पर्पल कॅपची स्पर्धा वाढतच चालली आहे.
ऑरेंज कॅप स्पर्धेत विराट कोहलीच किंग -
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीची कामगिरी अतिशय खराब सुरु आहे, पण विराट कोहलीनं मात्र खोऱ्यानं धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीनं 72 च्या सरासरीने सात सामन्यात 361 धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीचा स्ट्राईक रेटही 148 इतका जबराट आहे. विराट कोहलीने सात सामन्यात एक शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली आहे. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत राजस्थानचा रियान पराग दुसऱ्या क्रमांकावर आहे. परागने सात सामन्यात 318 धावा चोपल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कोलकात्याचा सुनील नारायण आहे. नारायण यानं एक शतक आणि एका अर्धशतकाच्या बळावर 276 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आहे, त्यानेही 276 धावा केल्या आहेत. शुभमन गिल पाचव्या क्रमांकावर आहे. गिल यानं 263 धावा केल्यात.
पर्पल कॅपची स्पर्धा रोमांचक
राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याच्याकडे सध्या पर्पल कॅप आहे. चहलने सात सामन्यात 18 च्या सरासरीने 12 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचा जसप्रीत बुमराह आणि दिल्लीचा खलील अहमद आहे. दोघांनी प्रत्येकी दहा दहा विकेट घेतल्या आहेत. आज पंजाबविरोधात बुमराहने तीन विकेट घेतल्यास पर्पल कॅप त्याच्याकडे जाईल. चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान 10 विकेटसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर पॅट कमिन्स नऊ विकेटसह पाचव्या स्थानावर आहे.
IPL पॉईंट टेबल
क्रमांक. | संघाचे नाव | सामने | विजय | टाय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|---|---|
1. |
राजस्थान रॉयल्स
RR
|
7 | 6 | 0 | 1 | 12 | 0.677 |
2. |
कोलकाता नाइट रायडर्स
KKR
|
6 | 4 | 0 | 2 | 8 | 1.399 |
3. |
चेन्नई सुपर किंग्स
CSK
|
6 | 4 | 0 | 2 | 8 | 0.726 |
4. |
सनरायजर्स हैदराबाद
SRH
|
6 | 4 | 0 | 2 | 8 | 0.502 |
5. |
लखनौ सुपर जायंट्स
LSG
|
6 | 3 | 0 | 3 | 6 | 0.038 |
6. |
दिल्ली कॅपिटल्स
DC
|
7 | 3 | 0 | 4 | 6 | -0.074 |
7. |
गुजरात टायटन्स
GT
|
7 | 3 | 0 | 4 | 6 | -1.303 |
8. |
पंजाब किंग्स
PBKS
|
6 | 2 | 0 | 4 | 4 | -0.218 |
9. |
मुंबई इंडियन्स
MI
|
6 | 2 | 0 | 4 | 4 | -0.234 |
10. |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
RCB
|
7 | 1 | 0 | 6 | 2 | -1.185 |