DC vs CSK, IPL 2023 : ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 223 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईच्या सलामी जोडीपुढे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवली. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी 141 धावांची सलामी दिली. दिल्लीला विजयासाठी 224 धावांचे आव्हान आहे.
नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी चेन्नईला दमदार सलामी दिली. ऋतुराज गायकवाड याने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यावेळी कॉनवे याने संयमी फलंदाजी केली. ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे यांनी 141 धावांची सलामी दिली. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज गायकवाड याने 79 धावांची वादळी खेळी केली. चेतन सकारिया याने ऋतुराजची खेळी संपुष्टात आणली. ऋतुराज गायकवाडड याने सात षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 50 चेंडूत 79 धावांची खेळी केली. तर डेवेन कॉनवे याने 52 चेंडूत 87 धावांचे योगदान दिले. कॉनवे याने तीन षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 52 चेंडूत 87 धावांचे योगदान दिले. कॉनवे आणि गायकवाड यांच्यापुढे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. दोघांनीही दिल्लीच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. ऋतुराज वादळी फलंदाजी करत होता, तेव्हा कॉनवे संयमी फलंदाजी करत होता. ऋतुराज गायरकवाड बाद झाल्यानंतर कॉनवे याने डावाची सुत्रे हातात घेतली. कॉनवे याने चौकार आणि षटकार लगावले. या जोडीपुडे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती.
ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर शिवम दुबे याने वादळी फलंदाजी केली. दुबेशिवाय जाडेजा आणि धोनी यांनीही अखेरच्या दोन षटकात चेन्नईची धावसंख्या वाढवली. शिवम दुबे याने 9 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 22 धावांचे योगदान दिले. जाडेजा आणि धोनीने चेन्नईची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. रविंद्र जाडेजा याने सात चेंडूत 20 धावांची छोटेखानी खेळी केली. अखेरच्या षटकात विकेट पडल्यामुळे चेन्नईची धावसंख्या आटोक्यात आली. जाडेजाने तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने चेन्नईच्या डावाला आकार दिला. धोनीने नाबाद 5 धावांची खेळी केली.
दिल्लीकडून खलील अहमद याने चार षटकात 45 धावा खर्च करत एक विकेट घेतली. तर एनरिक नॉर्खिया याने चार षटकात 43 धावा खर्च केल्या. चेतन सकारिया याने 3 षटकात 20 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. तर कुलदीप यादव याने तीन षटकात 34 धावा दिल्या. ललीत यादव याने दोन षटकात 32 धावा दिल्या. अक्षर पटेल याने तीन षटकात 32 धावा दिल्या.