SRH vs KKR, IPL 2022 : हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोलकाता प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये 25 वा सामना होत आहे. दोन्ही संघात बदल करण्यात आले आहे. हैदराबाद संघाने दुखापतग्रस्त वॉशिंगटन सुंदरच्या जागी जगदिश सुचितला संधी देण्यात आली आहे. तर कोलकाता संघात तीन बदल करण्यात आले आहे. कोलकाताने अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स आणि राशिक सलाम यांना आराम दिला आहे. यांच्या जागी फिंच, शेल्डॉन जॅक्सन आणि अमन खानला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. 


रहाणेचं निराशाजनक प्रदर्शन 
आयपीएलच्या 15 व्या हंगामात अजिंक्य राहणेची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात रहाणेनं फक्त 80 धावा चोपल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे, अजिंक्य रहाणेला 15 व्या हंगामात एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. रहाणेचा स्ट्राईक रेटही फक्त 100 राहिला आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेला प्लेईंग 11 मधून वगळण्यात आले. अजिंक्य रहाणेएवजी ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज अॅरोन फिंचला संधी दिली आहे.  


हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये आतापर्यंत 21 सामन्यांमध्ये हैदराबाद आणि कोलकाता संघ आमनेसामने आले आहेत. या 21 सामन्यांपैकी हैदराबादनं 7 तर कोलकातानं 14 सामने जिंकले आहेत. मागील आकडेवारीच्या आधारे केकेआरचे पारडे जड असल्याचे दिसत आहे.  


कोलकाताची प्लेईंग 11 -
अॅरॉन फिंच, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितेश राणा, आंद्रे रसेल, शेल्डॉन जॅक्सन (विकेटकिपर), पॅट कमिन्स, सुनिल नारायन, उमेश यादव, वरुण चर्कवर्ती, अमन खान 


हैदराबादची प्लेईंग 11 - 
 अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकिपर), ए. मार्करम, शशांक सिंह, जगदीश सुचित, उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मार्को जेनसन