IPL 2022 : आयपीएलचा रणसंग्राम सुरु होऊन दोन आठड्याचा कालावधी उलटला आहे. यंदाच्या हंगमात आरसीबीने दणक्यात सुरुवात केली आहे. चार सामन्यापैकी तीन सामने जिंकत आरसीबी फॉर्मात आहे. मंगळवारी आरसीबीचा सामना चेन्नईसोबत होणार आहे. त्यापूर्वीच आरसीबीच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. चेन्नईविरोधात दोन घातक गोलंदाजांची आरसीबीच्या ताफ्यात एन्ट्री झाली आहे. हे दोन्ही विदेशी गोलंदाज आहे. चेन्नईविरोधात होणाऱ्या सामन्यात या दोन्ही गोलंदाजांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.


रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. या संघाला आणखी मजबूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे दोन वेगवान गोलंदाज ताफ्यात पोहचले आहेत.  जेसन बेहरेनडॉर्फ (Jason Behrendorff) आणि जोश हेजलवूड (Josh Hazelwood) यांचा आरसीबीच्या ताफ्यात समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियातून आल्यानंतर या दोन्ही गोलंदाजांनी आपला क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. मंगळवारी होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही गोलंदाज उपलब्ध असणार आहे. दोन्ही गोलंदाजांनी संघासोबत सराव सुरु केला आहे. आरसीबीने ट्विट करत याची माहिती दिली आहे. 






आयपीएलच्या 15 व्या हंगामात आरसीबीचं नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू फाफ डु प्लेसिस करत आहे. डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीने चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.


 


रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संपूर्ण संघ -

फाफ ड्यू प्लेसी          कर्णधार/फलंदाज

अनुज रावत               विकेटकिपर
दिनेश कार्तिक          विकेटकिपर
लवनिथ सिसौदिया   विकेटकिपर
फिन एलन             विकेटकिपर

विराट कोहली              फलंदाज
सुयेश प्रभुदेसाई               फलंदाज

जोश हेझलवूड               गोलंदाज
मोहम्मद सिराज                गोलंदाज
अकाशदीप               गोलंदाज
जेसन बेहरनडॉर्फ                गोलंदाज
सिधार्थ कौल                गोलंदाज
चामा मिलिंद                गोलंदाज
कर्ण शर्मा                गोलंदाज

ग्लेन मॅक्सवेल               अष्टपैलू
हर्षल पटेल                   अष्टपैलू
शाहबाज अहमद              अष्टपैलू
वानिंदू हसारंगा              अष्टपैलू
अनीश्वर गौतम              अष्टपैलू
शेरफन रुदरफर्ड               अष्टपैलू
महिपल लोमरोर            अष्टपैलू
डिविड विली           अष्टपैलू