Rohit Sharma Meeting With KKR Staff and Players कोलकाता : आयपीएलचं 17 वं पर्व मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आणि रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) निराशाजनक ठरलं आहे. रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचं नेतृत्त्व करत नसून त्याच्याऐवजी हार्दिक पांड्याकडे नेतृत्त्वाची धुरा सोपवण्यात आली होती. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅच कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर पार पडली. या मॅचपूर्वी रोहित शर्मा आणि अभिषेक नायरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. खरंतर तो व्हिडीओ कोलकाता नाईट रायडर्सनं पोस्ट केला होता. त्या व्हिडीओत रोहित शर्मानं केलेल्या वक्तव्यांची जोरदार चर्चा झाली. केकेआरनं काही वेळातच तो व्हिडीओ डिलीट केला होता. रोहित शर्मा पुढच्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळावं अशी इच्छा पाकिस्तानचे माजी खेळाडू वासिम आक्रम यांनी व्यक्त केली होती. यावरुन चर्चा सुरु असतानाच रोहित शर्मा काल केकेआरच्या प्रशिक्षकांसोबत आणि खेळाडूंसोबत चर्चा करताना आढळून आला. या बैठकीचा फोटो व्हायरल झाल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मॅचला पावसामुळं उशीर झाला होता. या दरम्यान रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांसोबत चर्चा करताना आढळून आला. साधारणपणे साडेसात वाजता सुरु होणारी मॅच सव्वा नऊ वाजता सुरु झाली. या दरम्यान रोहित शर्मा आणि केकेआरचे प्रशिक्षक, खेळाडू यांच्यात बैठक झाली त्यामध्ये सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि केएस भरत आणि मनिष पांडे हे केकेआरचे खेळाडू सोबत होते.
कोलकाता नाईट रायडर्सनं अभिषेक नायर आणि रोहित शर्मा यांच्यासोबतचा एक व्हिडीओ डिलीट केल्यानंतर पुन्हा हा फोटो समोर आल्यानं चर्चांना उधाण आलंय. माजी क्रिकेटपटू वासिम आक्रम यांनी पुढील वर्ष रोहित शर्मा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना पाहायला मिळावं असं म्हटलं आहे.
रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यामध्ये काय चर्चा?
कोलकाता आणि मुंबईची मॅच होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती."एक-एक गोष्ट बदलत आहे, ते त्यांच्यावर आहे, जे पण आहे ते माझे घर आहे भावा, ते मंदिर आहे ना ते मी बनवलं आहे. भावा माझं काय, माझं तर हे शेवटचं", असं रोहित शर्मा म्हणत असल्याचा दावा करण्यात येतो.
संबंधित बातम्या :
Video : सुनील नरेन यॉर्कर पाहत राहिला अन् दांड्या गुल, केकेआरचा हिरो जसप्रीत बुमराह पुढं ठरला झिरो