Mahela Jayawardena T20 XI: श्रीलंकेच्या माजी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) प्रशिक्षक महेला जयवर्धनेनं त्याची ड्रीम टी-20 इलेव्हन निवडली आहे. या संघात स्थान मिळवणारा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.बुमराह विकेट घेण्यासोबतच शेवटच्या षटकात धावा रोखणाराही प्रभावी गोलंदाज आहे. त्याचबरोबर राशिद खान (Rashid Khan), शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi), जोस बटलर (Jos Buttler) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांचाही या यादीत समावेश आहे.


महेला जयवर्धने म्हणाला की, "जसप्रीत बुमराहकडं सामन्याच्या कोणत्याही षटकात विकेट घेण्याची क्षमता आहे. जेव्हा तुम्हाला विकेट्सची गरज असते, त्यावेळी तुम्हाला जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज हवा असतो."  राजस्थान रॉयल्सचा जोस बटलरकडे ऑरेंज कॅप आहे. बटलरनं या हंगामात तीन अर्धशतक झळकावली आहेत. "मला जोस बटलरसोबत माझी टीम ओपन करायला आवडेल. कारण तो खूप आक्रमक फलंदाज आहे आणि तो फिरकी सोबतच वेगवानही खेळतो. सध्याच्या आयपीएलशिवाय, बटलरने गेल्या टी-20 विश्वचषकातही चांगली कामगिरी केली आहे. बटलरनं यूएईमध्येही धावा केल्या, जिथं धावा काढणं सोपं नव्हतं", असंही जयवर्धनेनं म्हटलंय.


ट्वीट-



जयवर्धनेनं निवडलेल्या संघात जोस बटलरसह वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलला सलामीला जाणार आहेत. ख्रिस गेल 30 वर्षाचा आहे. जोस बटलरसह ख्रिस गेलला एकत्रित पाहणं, हा एक अनुभव असेल. 
2007 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक झाला, तेव्हा ख्रिस गेलनं दमदार कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यानं शतक झळकावलं होतं. त्याचं हे शतक खास होतं. नुकताच सर गारफिल्ड पुरस्काराने सन्मानित पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीलाही महेलानं आपल्या संघात ठेवलं आहे. तो म्हणाला की शाहीनचा शेवटचा टी-20 विश्वचषकही शानदार होता. सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्याव्यतिरिक्त शाहीन नंतरच्या षटकांमध्येही चांगली गोलंदाजी करू शकतो, असेही तो म्हणाला.
 
हे देखील वाचा-