हैदराबाद : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने आले आहेत. हार्दिक पांड्या यानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहरनं हैदराबादला सुरुवातीलाच प्रत्येकी दोन धक्के दिले. दीपक चाहरनं इशान किशनची विकेट घेतली. पंचांनी इशान किशनला बाद दिलं मात्र त्यानं डीआरएस घेतला असता तर त्याला तिसऱ्या पंचांनी बाद नसल्याचं जाहीर केलं असतं.  मुंबईकडून इशान किशन बाद असल्याची जोरदार अपील करण्यात आली नाही.यामुळं अम्पायरचा गोंधळ उडाला. 

इशान किशनच्या विकेटवेळी काय घडलं?

मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादला जोरदार धक्के दिले. दीपक चाहरनं तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर इशान किशनला बाद केलं.  हा बॉल इशान किशनच्या लेग साईडनं बॉल रियान रिकल्टनकडे गेला. हा बॉल इशान किशनच्या बॅट जवळून गेला मात्र बॅटला लागलेला नव्हता. याचा अंदाज असल्यानंच सुरुवातीला मुंबईच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली नव्हती. मुंबईचे खेळाडू अपील करत नसल्यानं अमप्यारचा मात्र गोंधळ उडाला. इशान किशन बाद असल्याचं जाहीर करण्यासाठी पहिल्यांदा पंचांनी हात वर केला. अपील करेनात म्हणून पुन्हा बोट खाली केलं. पुन्हा मुंबईच्या खेळाडूंनी अपील केलं अन् पंचांनी पुन्हा हात वर केला. 

इशान किशन यानं डीआरएस घेतला असता तर

इशान किशन बाद असल्याचं अपील मुंबईच्या बहुतांश खेळाडूंनी केलंच नव्हतं. पंचांनी बाद असल्याचं जाहीर करताच इशान किशन डीआरएस न घेता पॅव्हेलियनच्या दिशेनं चालत गेला. यावेळी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी इशान किशनची थट्टा केली. इशान किशनला त्यांनी पॅव्हेलियनच्या दिशेनं पाठवलं. दीपक चाहरनं टाकलेला चेंडू बॅटला लागून गेला असावा असा समज इशान किशनचा झाला. रिप्ले मात्र बॉल इशान किशनच्या बॅटला लागलेला नव्हता हे स्पष्ट झालं. 

दरम्यान, हेरनिक क्लासेन याच्या 71 आणि अभिषेक मनोहरच्या 43  धावांच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादनं 8 बाद 143 धावा केल्या. हेनरिक क्लासेन आणि अभिषेक मनोहरनं 99 धावांची भागीदारी केली.

पाहा व्हिडिओ : 

इतर बातम्या :