Yuzvendra Chahal 350 Wickets : युजवेंद्र चहल यानं टी20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चहल यानं टी20 क्रिकेटमध्ये 350 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा चहल पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय आहे. युजवेंद्र चहल यानं पियूष चावला आणि आर. अश्विन यांना मागे टाकत हा विक्रम केला आहे. दिल्लीविरोधात चहल यानं एक विकेट घेताच हा पराक्रम केला आहे.  


युजवेंद्र चहल यानं टी20 क्रिकेटमध्ये आता 350 विकेटचा पल्ला पार केला आहे. असा पराक्रम करणारा चहल पहिलाच भारतीय खेळाडू ठरला, तर टी20 क्रिकेटच्या इतिहासातील पाचवा फिरकी गोलंदाज ठरला आहे. युजवेंद्र चहल यानं 301 सामन्यात 350 विकेटचा पल्ला पार केला. युजवेंद्र चहल यानं दिल्लीविरोधात एक विकेट घेताच हा भीमपराक्रम केला आहे. युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्सचा सदस्य राहिलाय. त्याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये चहल हरियाणा संघाकडून खेळतो. टीम इंडियाकडूनही त्यानं शानदार कामगिरी केली आहे. 


युजवेंद्र चहल याच्यानंतर टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनुभवी पियुष चावला याच्या नावावर आहे. पियुष चावला याने 293 टी20 सामन्यात 301 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत शाकीब अल हसन चौथ्या क्रमांकावर आहे. शाकीब अल हसन याने 428 टी 20 सामने खेळले आहेत. शाकीबच्या नावावर 482 विकेटची नोंद आहे. 






टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फिरकी गोलंदाजांचामध्ये इम्रान ताहीर तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ताहीरने जगभरातील टी20 क्रिकेट लीगमध्ये प्रतिनिधित्व केलेय. त्यानं 405 टी 20 सामन्यात 502 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 



सुनील नारायण या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. नारायण यानं जगभरातील 14 संघाकडून टी20 सामने खेळले आहेत. नारायण यानं 509 टी20 सामने खेळले आहेत. नारायण यानं टी20 क्रिकेटमध्ये 550 विकेटचा पल्ला पार केला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट अफगाणिस्तानच्या राशिद खान याच्या नावावर आहेत. राशिद खानही जगभरातील टी20 क्रिकेट लीगमध्ये खेळतो. राशीद खान याने 424 टी20 सामने खेळले आहेत. राशिद खान याने तब्बल 572 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम डेवॉन ब्रॉव्होच्या नावावर आहे. ब्राव्हो यानं टी20 क्रिकेटमध्ये 625 विकेट घेतल्या आहेत.