SRH Team Preview: आयपीएलचा पंधरावा सुरु होण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत सनरायझर्स हैदाराबादच्या संघावर सर्वांची नजर असेल. हैदराबादनं आतापर्यंत आयपीएलचे दोन खिताब जिंकले आहेत. तर, तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी हैदराबादचा संघ मैदानात उतरणार आहे. याआधी हैदराबादच्या संघाची ताकद आणि कमजोरी यावर एक नजर टाकुयात.
हैदराबादच्या संघाची भक्कम बाजू
सनरायझर्स हैदराबाद संघात खूप वैविध्य आहे. हैदराबादमधील फलंदाज कोणत्याही क्रमाकांवर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतात. एवढेच नव्हेतर, पार्ट टाईम गोलंदाजीही करू शकतात. कर्णधार विल्यमसनशिवाय निकोलस पूरन आणि अब्दुल समद मधल्या फळीत खेळताना दिसणार आहेत. संघाकडे गोलंदाजीचे चांगले पर्याय आहेत.अशा स्थितीत प्रत्येक वेळीप्रमाणेच संघाची गोलंदाजी ही भक्कम बाजू आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि रोमॅरियो शेफर्ड या दोन उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंना हैदराबादनं खरेदी केलंय. भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि उमरान मलिक वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील. याशिवाय संघाकडे कार्तिक त्यागी, टी नटराजन, मार्को येन्सन, शॉन अॅबॉट, उमरान मलिक, फजलहक फारुकी हे पर्यायी गोलंदाज मिळाले आहेत.
ऑरेंज आर्मीची कमजोरी
निकोलस पूरन आणि एडन मार्कराम यांची फलंदाजीचा क्रमांक निश्चित करणे, हे संघ व्यवस्थापनासाठी सर्वात कठीण गोष्ट असणार आहे. टी-20 विश्वचषकात मार्करामनं दक्षिण आफ्रिकेसाठी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत चांगली फलंदाजी केली होती. आयपीएलच्या मागच्या हंगामात निकोलस पूरननं निराशाजनक कामगिरी करून दाखवली होती. पूरन हा तिसऱ्या क्रमांकापासून तर, पाचव्या क्रमांकापर्यंत कुठेही फलंदाजी करू शकतो. केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतर राहुल त्रिपाठी आणि त्यानंतर पूरनला फलंदाजीसाठी पाठवले जाईल.सनरायझर्स हैदराबादनं पूर्वीप्रमाणेच या मेगा ऑक्शनमध्येही गोलंदाजांवर अधिक पैसे खर्च केले. त्यामुळे सामन्यादरम्यान हैदराबादसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. फलंदाजीच्या क्रमवारीत एकही कॅप्ड भारतीय फलंदाज नाही. ही संघाची सर्वात मोठी कमजोरी आहे. जर विल्यमसन कोणत्याही कारणास्तव संघाबाहेर गेल्यास हैदराबादसाठी त्याचा बदली खेळाडू शोधणे कठीण होईल. याशिवाय संघाकडे दर्जेदार फिरकीपटू नाहीत. सुंदरशिवाय श्रेयस गोपाल आणि अभिषेक शर्मा हे स्पिनर म्हणून उपस्थित आहेत. प्लेइंग-11 साठी संघाला पुन्हा एकदा संघर्ष करावा लागू शकतो.
हे देखील वाचा-
- Delhi Capitals Team Preview : ‘दिल्ली में है दम’, ऋषभ पंत दिल्लीला आयपीएल चषक जिंकून देणार का?
- PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाचा दबदबा, पाकिस्तानमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली, 24 वर्षाचा विक्रम कायम
- Rajasthan Royals Team Preview: फलंदाजी- गोलंदाजी मजबूत, पण ऑलराऊंडर आणि फिनिशरबाबत राजस्थानचा संघ कसा?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha