IPL 2024 RR vs RCB  : जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर आज राजस्थान आणि आरसीबी यांच्यामध्ये रॉयल आमनासामना होणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघ सध्या तुफान फॉर्मात आहे, ते स्पर्धेत अजय आहेत. दुसरीकडे आरसीबीच्या संघाला अद्याप लय सापडलेली नाही. आज, आरसीबीचा संघ राजस्थानची विजयी घौडदौड रोखणार का? की राजस्थान विजयी लय कायम राखणार? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. आज संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 


संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत तीन सामन्यात विजय मिळवलाय, ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. आरसीबीला चार सामन्यात फक्त एक विजय मिळवता आलाय. तीन पराभवाचा सामना करणारा आरसीबी गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहेत. लखनौने मागील सामन्यात आरसीबीचा 28 धावांनी पराभव केला होता. डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबी विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल, हेड टू हेड आकडे काय सांगतात.. पाहूयात


RR vs RCB Pitch Report: जयपूर सवाई मानसिंह स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल ?


जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमच्या (Sawai Man Singh Stadium Jaipur) खेळपट्टीवर फलंदाजांचा बोलबाला राहतो. विशेष म्हणजे, अचूक टप्प्यावर मारा केल्यास खेळपट्टी गोलंदाजांनाही मदत करते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतो. स्टेडियम मोठं असल्यामुळे चौकार-षटकार लगावण्यासाठी फलंदाजांना मेहनत घ्यावी लागते.  


आकडे काय सांगतात ? (Sawai Man Singh Cricket Stadium,Jaipur Stats)


सवाई मानसिंह स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 128 सामने झाले आहेत. या मैदानावर आयपीएलचे 52 सामने झाले आहेत. यामध्ये 33 सामन्यात यजमान संघाचा विजय झाला तर 19 सामन्यात पाहुण्या संघाने बाजी मारली आहे. 


RR vs RCB Head To Head Record: राजस्थान आणि आरसीबी हेड-टू-हेड रिकॉर्ड


आयपीएलमध्ये राजस्थान आणि आरसीबी यांच्यामध्ये 27 वेळा लढत झाली, ज्यामध्ये राजस्थान संघाने 12 वेळा विजय मिळवला आहे. आरसीबीने 15 सामने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करताना दोन्ही संघाने प्रत्येकी पाच पाच सामन्यात विजय मिळवला आहे. धावांचा पाठलाग करताना आरसीबीने 10 तर राजस्थानने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. 


आरसीबीची संभाव्य प्लेईंग 11


विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स/कॅमरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), कर्ण शर्मा, रीस टॉपले, मोहम्मद सिराज, यश दयाल। 


राजस्थान रॉयल्स प्लेईंग 11 :


यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान/संदीप शर्मा, नंद्रे बर्गर, युजवेंद्र चहल