IPL 2024 Playoffs Qualification Scenario : आयपीएल 2024 स्पर्धा आता ऐन रंगात आली आहे. आठ पराभवानंतर मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांचं प्लेऑफचं तिकिट आता जवळपास निश्चित झाले आहे. कोलकाता आणि राजस्थान यांचे प्रत्येकी 16 - 16 गुण आहेत. त्यांचे प्लेऑफमधील स्थान आता निश्चित मानले जातेय. दुसरीकडे दोन जागासाठी आता सात संघामध्ये स्पर्धा सुरु आहे. पाहूयात, प्लेऑफचं नेमकं समीकरण काय असेल...

लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) 98 धावांनी पराभव करत कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. कोलकात्याचं 11 सामन्यात 16 गुण झाले आहेत.  कोलकात्याचं आता तीन सामने शिल्लक आहेत. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचे 10 सामन्यात 16 गुण झाले आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 16 गुणांची गरज आहे, त्यामुळे राजस्थान आणि कोलकाता यांचं स्थान आता निश्चित मानले जातेय. 

दोन जागा, तीन संघात जोरदार स्पर्धा -

दहा संघापैकी चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतात. आता दोन संघांचं स्थान निश्चित झालेय, तर मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आले आहे. उर्वरित दोन जागांसाठी सात संघामध्ये स्पर्धा असेल. यामध्ये चेन्नई, हैदराबाद आणि लखनौ संघाची स्थिती इतरांपेक्षा चांगली आहे. त्यामुळे या तिन्ही संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे चान्ससे जास्त आहेत. हैदराबाद, चेन्नई आणि लखनौ संघाचे प्रत्येकी 12 गुण आहेत. त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आणखी दोन दोन सामन्यात तरी विजय मिळवावाच लागेल. चेन्नई आणि लखनौ संघाचे तीन तीन सामने शिल्लक आहेत, तर हैदराबाद संघाचे चार सामने शिल्लक आहेत. हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहचण्याचे 75 टक्के चान्सेस आहेत, तर चेन्नईचे 60 टक्के अन् लखनौचे 50 टक्के चान्सेस आहेत. 

दिल्लीचा संघ काटावर - 

ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली संघालाही प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. दिल्लीचे 11 सामन्यात 10 गुण आहेत. उर्वरित तीन सामन्यात दिल्लीने विजय मिळवल्यास 16 गुण होतील. तिन्ही सामने दिल्लीने मोठ्या फरकाने जिंकले तर दिल्ली प्लेऑफमद्ये पात्र होऊ शकते. दिल्लीचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे चान्स 12 टक्के आहेत. 

आरसीबी, पंजाब अन् गुजरातच्या आशा जिवंत - 

आरसीबी, पंजाब आणि गुजरात संघ सध्या एकाच जहाजात आहेत. या तिन्ही संघाच्या फक्त आशा जिवंत राहिल्यात. आरसीबी, पंजाब आणि गुजरात संघाचे 11 सामन्यात 8 गुण आहेत. हे संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकतात, पण नशिबाची साथ लागेल. उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळवावाच लागेल, त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागेल.  मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमधून बाहेर गेला, पण इतर संघाचे गणित बदलवू शकतात. आज हैदराबाद आणि मुंबईचा सामना आहे. या सामन्याकडे सर्वच संघाचे लक्ष असेल.

IPL पॉईंट टेबल

 
No. TEAMS P W T L Pt NRR
1.
KKR
11 8 0 3 16 1.453
2.
RR
10 8 0 2 16 0.622
3.
CSK
11 6 0 5 12 0.700
4.
SRH
10 6 0 4 12 0.072
5.
LSG
11 6 0 5 12 -0.371
6.
DC
11 5 0 6 10 -0.442
7.
RCB
11 4 0 7 8 -0.049
8.
PBKS
11 4 0 7 8 -0.187
9.
GT
11 4 0 7 8 -1.320
10.
MI
11 3 0 8 6 -0.356