IPL's One of the Best Catch : कोलकाता नाईट रायडर्सनं रविवारी लखनौ सुपर जायंट्सचा दारुण पराभव केला. या विराट विजायनंतर कोलकात्यानं प्लेऑफच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचं 11 सामन्यात 16 गुण आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता यंदा भन्नाट फॉर्मात आहे. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असणाऱ्या कोलकात्यानं प्लेऑफमधील आपलं स्थान अधिक बळकट केलेय. लखनौविरोधात कोलकात्याच्या रमनदीपनं घेतलेला झेल सध्या चर्चेत आहे. रमनदीप यानं 21 मीटर धावत हवेत घेतलेला झेल यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम असल्याचं बोललं जातेय. रमनदीप सिंह यानं घेतलेला झेल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी त्याचं कौतुक केलेय. 


रमनदीप याने 21 मीटर पळून घेतला अप्रतिम झेल -


कोलकाता नाइट रायडर्सच्या रमनदीप सिंह यानं लखनौ सुपर जायंट्सविरोधात अप्रतिम फिल्डिंग केली. त्यानं डायव्हिग झेल घेत सर्वांचं लक्ष वेधलेय. रमनदीप सिंह यानं झेल घेण्यासाठी 21 मीटर धावत पल्ला पार केला. त्यानंतर हवेत झेपवत शानदार झेल घेतला. कोलकाताचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यानं लखनौचा सलामी फलंदाज अर्शिन कुलकर्णी याला लेंथ चेंडू फेकला होता. अर्शिन कुलकर्णी यानं फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूनं बॅटची कड घेतली. चेंडू हवेत उडाला...हा झेल घेण्यासाठी सर्कलमध्ये उभा असणाऱ्या रमनदीप सिंह यानं मोठी धाव घेतली. त्यानं 21 मीटर धावत जात अर्शिनचा झेल घेतला. रमनदीप सिंह याच्या झेलचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. 


पाहा झेल -







रमनदीपने  फलंदाजीतही जलवा दाखवला - 


रमनदीप यानं फलंदाजीतही आपला जलवा दाखवला. ज्यामुळे कोलकात्याला लखनौविरोधात मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं. रमनदीप सिंह यानं फक्त सहा चेंडूमध्ये 25 धावांचा पाऊस पाडला, त्यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता. रमनदीप सिंह यानं तळाला वेगानं धावा जमवल्या. त्यामुळे कोलकात्यानं 20 षटकात 235 धावा फलकावर लावल्या.  


सुनील नारायणपुढे लखनौची दाणादाण


कोलकाता नाइट रायडर्सचा सलामी फलंदाज सुनिल नारायण याच्यापुढे लखनौच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्यानं अप्रतिम कामगिरी केली. नारायण यानं फलंदाजीमध्ये  39 चेंडूमध्ये 81 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये सात षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर गोलंदाजीत त्यानं भेदक मारा केला. नारायण यानं चार षटकात फक्त 22 धावा खर्च करत एक विकेट घेतली.