IPL 2022 Update : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चं बिगुल वाजले आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. तर 29 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गुरुवारी आयपीएलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत यंदा भारतातच आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. मेगा लिलाव पार पडल्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकांकडे चाहत्यांचं लक्ष लागले होते. (IPL Schedule 2022) का इंतज़ार था. यावेळी आयपीएल स्पर्धेच्या लीग सामन्याचे आयोजन मुंबई आणि पुण्यात केले जाणार आहे. मुंबई आणि पुण्यातील चार मैदानात 70 सामने खेळवले जाणार आहेत. पुण्यात 15 सामने होण्याची शक्यता आहेत. लवकरच आयपीएलचे अधिकृत वेळापत्रक जारी होणार आहे. (IPL 2022 Match Date & Time)
यंदा दहा संघामध्ये आयपीएलचा थरार रंगणार आहे. पाहूयात कोणते आहेत दहा संघ ..
1. दिल्ली कॅपिटल्स
2. चेन्नई सुपर किंग्स
3. मुंबई इंडियंस
4. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु
5. कोलकाता नाइट राइडर्स
6. पंजाब किंग्स
7. गुजरात टायटन्स
8. लखनऊ सुपर जायंट्स
9. सनराइजर्स हैदराबाद
10. राजस्थान रॉयल्स
दरम्यान, आयपीएलमध्ये यंदा आठच्या जागी 10 संघ खेळवले जाणार आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायटंस या दोन संघाना यंदा आयपीएलमध्ये एन्ट्री देण्यात आली आहे. नुकताच आयपीएलचा महालिलावही पार पडला. आयपीएलच्या संपूर्ण लिलाव प्रक्रियेत एकूण 5 अब्ज, 51 कोटी आणि 70 लाख रुपये खर्च झाले. यादरम्यान लखनौ सुपर जायंट्सने 21 खेळाडूंसाठी संपूर्ण 90 कोटी रुपये खर्च केले. विशेष म्हणजे, लखनौ फ्रँचायझीने बाकीच्या संघांच्या तुलनेत कमी खेळाडूंना खरेदी केलं. लखनौ सुपर जायंट्सनं केएल राहुलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय राहुल व्यतिरिक्त फ्रँचायझीनं मार्कस स्टॉयनिस आणि रवी बाश्नोई यांनाही लिलावापूर्वी साइन केलं होतं.