Hardik Pandya IPL MI Captain : अखेर मुंबईने यंदाच्या हंगामात विजयाची चव चाखलीच. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पहिला विजय नोंदवला. पण, पहिल्या तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. याची खंत तर हार्दिक पांड्याला असेलच. पण पहिल्या तिन्ही सामन्यावेळी हार्दिक पांड्याला चाहत्यांकडून जोरदार ट्रोल करण्यात आले. स्टेडियममध्ये बसणाऱ्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याचं हूटिंग होत होतं. पण रविवारी वानखेडे मैदानावर हार्दिक पांड्याचं हूटिंग झालं नाही. त्याला चाहत्यानं सपोर्ट केला. हार्दिक पांड्याला त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला असेल. पण हार्दिक पांड्याला पुढील सामन्यात हूटिंगचा सामना कारावा लागू शकतो. कारण, रविवारी 18000 मुलं सामना पाहायला आलेली, त्यांनी हार्दिक पांड्याला हूटिंग केले नाही. पण पुढील सामन्यावेळी कदाचीत चित्र वेगळं असू शकतं.
रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरोधातील सामन्यावेळी चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला कोणत्याही प्रकारे हूटिंग केले नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याला दिलासा मिळाला. सामन्यानंतर हार्दिक पांड्याने सर्व चाहत्यांचे आभारही मानले. सामन्यानंतर सगळ्या स्टेडियमला फेरा मारत हार्दिक पांड्या आणि मुंबईच्या संघाने आभार व्यक्त केले. रविवारी झालेला सामना लियानस् फाऊंडेशनसाठी ईएमए दिवस म्हणून खेळला होता. त्यामुळेच स्टेडियमध्ये तब्बल 18 हजार चिमुकले हजर होते. स्टँडमधील सर्व मुलांनी मुंबई इंडियन्सला सपोर्ट केला. पण मागील तीन सामन्यात त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यावर डाव खेळला. मुंबईने हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड केले. मुंबईने रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याकडे धुरा सोपवली. मुंबईच्या या निर्णायाची सर्वच स्तरावरुन खिल्ली उडवली गेली. अनेक माजी खेळाडूंनी यावर आक्षेपही घेतला. नाराज चाहत्यांनी हार्दिक पांड्याला स्टेडियममध्ये आणि सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले. त्याला हूटिंगचा सामना करावा लागला. हार्दिकला कर्णधारपद सोपवताना रोहित शर्माकडून ते काढून घेण्यात आलं होतं यामुळं मुंबईचे चाहते नाराज झाले होते. पण रविवारी हार्दिक पांड्याला सपोर्ट मिळाला. भविष्यात काय स्थिती असेल? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
हार्दिकच्या सपोर्टमध्ये उतरला गांगुली -
क्रिकेटचा दादा, अर्थात सौरव गांगुली हार्दिक पांड्याच्या सपोर्टसाठी पुढे आला. हार्दिक पांड्याबाबत ज्या प्रकारे प्रेक्षकांकडून वर्तन केलं जात आहे ते चुकीचं आहे, असे गांगुली म्हणाला.
रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचं 10 वर्षांहून अधिक काळ नेतृत्त्व केलं. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सनं 2020 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतरच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील मुंबईला विजेतेपद मिळवता आलं नव्हतं. यानंतर मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं 2021 ला संघातून रिलीज केलेल्या हार्दिक पांड्याला पुन्हा संघात घेतलं. गुजरात टायटन्समधून हार्दिक पांड्याला मुंबईमध्ये आणून कर्णधारपद सोपवलं. या सर्व घटनांमुळं मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. सौरव गांगुलीनं हार्दिक पांड्यानं मुंबईचं कर्णधारपद भूषवणं हा फ्रँचायजीचा निर्णय असून हार्दिक पांड्याची चूक नाही, असं सौरव गांगुलीनं म्हटलं.