IPL Mega Auction 2025 : एकीकडे ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल सारख्या खेळाडूंनी आयपीएल 2025 मध्ये लॉटरी लागली, तर दुसरीकडे असे काही खेळाडू आहेत ज्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. आयपीएल 2025 च्या लिलावात सॅम करनला फक्त 2.40 कोटी रुपये मिळाले. सॅम करन आता चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे.
आयपीएल लिलावात सॅम करनला 16.10 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या हंगामापर्यंत करनला दरवर्षी 18.50 कोटी रुपये मिळत होते, परंतु आता हा खेळाडू 16.10 कोटी रुपयांच्या तोट्यासह केवळ 2.40 कोटी रुपयांना विकला गेला आहे. सॅम करन हा जगज्जेता खेळाडू आहे. 2022 मध्ये त्याने इंग्लंडला टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिला. तो प्लेअर ऑफ द सीरीज ठरला आणि त्यामुळेच त्याला आयपीएलमध्ये मोठी रक्कम मिळाली, पण मग असे काय झाले की त्याला या लिलावात जास्त पैसे मिळाले नाही.
सॅम करनला कमी पैसे का मिळाले?
सॅम करनने गेल्या हंगामात पंजाब किंग्ससाठी 270 धावा केल्या होत्या. याशिवाय, या खेळाडूने 16 विकेट्सही घेतल्या, परंतु त्याचा इकॉनॉमी रेट प्रति षटकात 10 धावांपेक्षा जास्त होता. सॅम करन त्याच्या किंमतीनुसार कामगिरी करू शकला नाही त्यामुळे पंजाबने त्याच्यावर बोलीही लावली नाही.
सॅम करनची आयपीएलमधील कामगिरी
सॅम करनने आतापर्यंत आयपीएलमधील 59 सामन्यांमध्ये 25 पेक्षा जास्त सरासरीने 883 धावा केल्या आहेत. हा खेळाडू मॅच फिनिशरची भूमिका बजावतो, त्यामुळे ही सरासरी चांगली आहे. याशिवाय त्याचा स्ट्राइक रेटही 136 पेक्षा जास्त आहे. याशिवाय करनने 58 विकेट्स घेतल्या आहेत. पॉवरप्लेमध्ये स्विंगच्या जोरावर विकेट घेण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे.
मुंबईकरांना मिळाला नाही लिलावात भाव!
भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे मूळ किंमत 1.50 कोटी घेऊन मैदानात उतरला आणि कोणत्याही संघाने त्याला घेण्यास रस दाखवला नाही. पृथ्वी शॉमध्ये कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर पहिल्या डावात न विकला गेला. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.