IPL 2022 Mega Auction, Jason Holder Can Sell The Most Expensive: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या (IPL) पंधराव्या हंगामाचं बिगुल वाजलंय. येत्या 12 व 13 फेब्रुवारीला बंगळुरू (Bengaluru) येथे आयपीएलच्या मेगा ऑक्शनचा (IPL Mega Auction 2022) कार्यक्रम पार पडणार आहे. परंतु, आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये वेस्ट इंडीजच्या ऑलराऊंडरला खरेदी करण्यासाठी प्रत्येक फ्रंचायझी जोर लावण्याची शक्यता आहे. 


वेस्ट इंडीजच्या माजी कर्णधार आणि ऑलराऊंडर जेसन होल्डरला खरेदी करण्यासाठी आयपीएल फ्रंचायझींमध्ये मोठी शर्यत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये जेसन होल्डरची मूळ किंमत 1.5 कोटी आहे. एवढंच नव्हे तर, जेसन होल्डर यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये सर्वात महाग खेळाडूही ठरण्याची शक्यता आहे.


आयपीएलच्या मागच्या हंगामात जेसन होल्डरची कामगिरी
आयपीएलच्या मागच्या हंगामात जेसन होल्डरनं चांगली कामगिरी बजावली होती. त्यानं 8 सामन्यात 16 विकेट्स घेतले होते आणि 85 धावा केल्या होता. तर, 47 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या होती. जेसन होल्डरला उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ओळखलं जातं. यंदाच्या आयपीएलमध्ये तो चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. यामुळं त्याला संघात समील करून घेण्यासाठी प्रत्येक फ्रंचायझी जोर लावण्याची शक्यता आहे.


आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये 590 खेळाडूंवर लागणार बोली
आयपीएलच्या या मेगा ऑक्शनमध्ये उपलब्ध 590 खेळाडूंपैकी सर्वोत्तम पर्यायांना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा प्रत्येक फ्रँचाईझीचा प्रयत्न असेल. त्या 590 खेळाडूंमध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू आहेत. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये दहा फ्रँचायझींकडून आपल्या पसंतीच्या शिलेदारावर दौलतजादा करण्यात येईल. आणि तोच असणार आहे आयपीएलचं मेगा ऑक्शन. या मेगा ऑक्शनसाठी प्रत्येक फ्रँचायझीच्या हाताशी त्यांच्या बटव्यात विशिष्ट रक्कम आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha