IPL 2022 Final : यंदा आयपीएलचा (ipl 2022) अंतिम सामना पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे थाटामाटात पार पडणार आहे. मागील काही वर्षे कोरोनामुळे समारोपादरम्यान मोठा थाट-माट होत नव्हता. पण यंदा बीसीसीआय मोठ्या उत्साहात आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचा समारोप करणार आहे. दरम्यान आयपीएल 2022 चा अंतिम सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार असून सामन्याला एक आठवडा शिल्लक असतानाच सर्व तिकिटांची विक्री झाली आहे. यंदा या सामन्याला एक लाखांहून अधिकजण उपस्थित राहणार असल्याची माहितीही समोर येत आहे.


या सामन्याच्या वेळेसंदर्भात काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने महत्त्वाची माहिती दिली होती. 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणारा आयपीएलचा फायनल मुकाबला इतर सामन्यांच्या सर्वात महत्त्वाचा असल्याने हा महामुकाबला अर्धा तास उशीरा सुरु होणार आहे. म्हणजेच भारतीय वेळेनुसार, रात्री  8 वाजता अंतिम सामना होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल. सध्या साडेसात वाजता आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होते, तर सात वाजता नाणेफेक होतो. तर दुपारचा सामना साडेतीन वाजता सुरु होतो अन् तीन वाजता नाणेफेक होते. 


दिमाखात होणार समारोप 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम आयोजत करण्यात येणार आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. आयपीएलचा क्लोजिंग समारोप 29 मे रोजी सायंकाळी साडेसाहा वाजता सुरु होणार आहे. हा कार्यक्रम 50 मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. तर आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 26 मार्च रोजी आयपीएलचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता... पण आज झालेल्या बैठकीत समारोप कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.  


प्लेऑफचे संघ जाहीर


आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या चार संघांनी आपले प्लेऑफमधील स्थान पक्के केलेय.  मुंबईने दिल्लीचा पराभव केल्यामुळे फाफच्या नेतृत्वातील आरसीबीला प्लेऑफचे तिकीट मिळाले आहे. पण अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यानंतरही मुंबईचा संघ तळाची राहिला आहे. 


हे देखील वाचा-